Posts

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

Image
जत/प्रतिनिधी : माजी सैनिक वेलफेअर असोशिएशन, जत तालुका व आजी माजी सैनिक कल्याण संघटना जत यांचे वतीने गुरुवारी दि.२९ रोजी सैनिकांचा महामेळावा तुकारामबाबा महाराज मठात आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेप्ट कर्नल भिमसेन चवदार हे उपस्थितीत राहणार असल्याची माहिती माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबनराव कोळी, उपाअध्यक्ष शुभेदार मेजर सिध्दु गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.    मेळाव्यास उप विभागिय अधिकारी अजितकुमार नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, जत तहसिलदार जीवन बनसोडे, संख अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे, ह.भ.प तुकामबाबा महाराज, जत पोलिस निरीक्षक सुरज बिजली, उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे उपस्थिती राहणार आहेत.    आजी, माजी सैनिकांच्या अडीअडचणी, समस्या यावर चर्चा होणार आहे. तरी सर्वांनी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.     यावेळी विजय कुरणे, बाळासाहेब दादासाहेब भोसले, आर.ए.स्वामी, आकाराम बिसले, भाऊसाहेब पाटील, दिपक खांडेकर, सतिश शिंदे, नानासाहेब कुटे, अब्बास सैय्यद, धानाप्पा बिराजदार, आकाराम गायकवाड, सजय धुमाळ, चन्नाप

रिपाईचा विविध मागण्यासाठी जत येथे विराट मोर्चा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क :      म्हैसाळ विस्तारित योजनेतील ६५ गावांचे काम तातडीने सुरू करावेत, जत शहराला किमान एक तास रोज पाणीपुरवठा करावा, नगरपरिषदेला पूर्णवळ मुख्याधिकारी मिळावा व पालिकेचा कारभार पाण्याच्या टाकीऐवजी नगरपरिषद कार्यालयातून व्हावा, अशा मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी (दि. ३१) रोजी शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, दिव्यांग वंचितांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइंचे जत विधानसभा प्रमुख महादेव हुचगोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.      ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे. तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, दिव्यांग व वंचित घटकांतील लोक सहभागी होणार आहेत. अधिक बोलताना ते म्हणाले कृषी विभागातील अधिकारी अरेरावीची भाषा करतात. वेळेवर कामावर हजर नसतात. त्यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांची चौकशी व्हावी, जत शहरात चौकाचौकांत शौचालये व मुतारीची व्यवस्था करावी, महाराणा प्रताप चौक ते महाराष्ट्र बँकेपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करावे, भूमि

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष

Image
फटांक्यांची जोरदार अतिशबाजी व भगव्या रंगाची उधळण करित साजरा केला विजयोत्सव जतवार्ता न्यूज नेटवर्क:     मराठा समाजाचे संघर्ष योध्दे मनोज जरांगे-पाटील यांच्या संघर्षामुळे मराठा समाजाला ओ.बी.सी.मधून अरक्षण मिळाल्याचे राज्यसरकारने शासन परिपत्रकाव्दारे जाहीर केल्याने त्याचा विजयोत्सव सकल मराठा समाजाने भगव्या रंगाची उधळण करित साजरा केला.    मराठा समाजाला ओ.बी.सी.मधून अरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योध्दे  जरांगे-पाटील हे गेले कित्येक महिने संघर्ष करित होते. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात समाजजागृती करण्याचे काम केले. त्यांना सर्वत्र समाजबांधवांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. तरिही राज्यसरकार मराठा समाजाला अरक्षण देण्याकडे चालढकल करताना दिसत होते.    त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योध्दे जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी ते मुंबई असा लाखो समाजबांधवाना सोबत घेऊन न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढून सरकारची सर्व बाजूनी कोंडी केली.    मनोज जरांगेंच्या या आक्रमकपणामुळे राज्य सरकारने नमते घेत आज वाशी मुंबई येथून मुख्यमंत

शाकंभरी पोर्णीमेनिमित्त श्री.स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;    जत शहरातील राजे रामराव महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज नगर या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ महाराजांचे भव्य असे मंदिर असून श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत च्या वतीने मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.    श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री. बापूसाहेब पवार,उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, गणेश सावंत, लक्ष्मण मोरे,मोहन पवार, नारायण पवार,राघव जोशी,सदाशिव जाधव, डी.बी.जाधव, अतुल मोरे,वसंत उगळे,आदी स्वामी भक्त दर पोर्णीमेला विविध कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे आयोजन करतात.    आज गुरुवारी शाकंभरी पोर्णीमेनिमित्त श्री.स्वामी समर्थ मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा तसेच महाराजांच्या पाठीमागील बाजूस असलेली मखर विविध भाज्यांनी सजविलेली होती.    सकाळी दहा ते बारा या वेळेत रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर दुपारी येथील अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जतचे अध्यक्ष श्री.शहाजीबापू भोसले यांच्याहस्

जतमध्ये विक्रम फौंडेशनकडून महिला सबलीकरण मेळावा व मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

Image
विक्रम फौंडेशनचे युवराज निकम व राजेंद्र माने यांची माहिती जतवार्ता न्यूज नेटवर्क :      महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व.डॉ.पतंगरावजी कदम यांच्या जयंती निमित्त  व डॉ. विश्वजित कदम माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम फौंडेशन जत यांचे वतीने महिला सबलीकरण मेळावा व गरजू रुग्णासाठी भारती हॉस्पिटल सांगली यांचे वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करणेत आल्याची माहिती विक्रम फौंडेशनचे युवराज निकम व राजेंद्र माने यांनी दिली.     या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.२५ जानेवारी २०२४ रोजी भारती विद्यापीठ मुलींचे वसतिगृह जत येथे सकाळी ९ ते सायं. ४ या वेळेत करणेत आले आहे. महिला सबलीकरण मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार प्रा.अप्पासाहेब खोत व उदय माळी जिल्हा संसाधन अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्याक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.तृप्ती धोडमिसे भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील व आ.विक्रमसिंह सावंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रम

सिद्धार्थ संकुल येथे सिद्धार्थ फेस्टिवल, व्याख्यानमाला व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन; डॉ. कैलास सनमडीकर

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;      सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी व श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन, जत यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी प्रमाणे "सिद्धार्थ फेस्टिवल" अंतर्गत राजर्षी छ. शाहू महाराज स्मृती व्याख्यानमाला तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.     जत तालुक्याचे भाग्यविधाते कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर(काका) यांनी गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे या करिता जतमध्ये आश्रमशाळा सुरु करून सामाजिक, राजकीय कामाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात आपले पाऊल टाकले. आज अखेर त्यांनी आश्रमशाळा, सी.बी.एस.सी.स्कूल, पॉलीटेकनिक कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरु केले आहेत.      विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच थोर समाजसुधारक, साहित्यिक, विचारवंत यांच्याबद्दलची माहिती, त्यांचे विचार ऐकावयास मिळावे. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आजअखेर श्री.द.मा. मिराजदार, श्री. रामदास फुटाणे, श्री. वामन व्होवाल, श्री. श्रीमंत कोकाटे, श्री. गंगाधर बनबरे, श्री. रवी बजंत्री यासारखे बरेच वक्ते कार्यक्रमास लाभले होते.      सालाबाद प्रमाणे याही वर्षी

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     आठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करणारे व समाजामध्ये आज त्यांना एक आदर्शवत राजे म्हणून ओळखले जाते असे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन जत फ्रेंड सर्कल व मराठा सेवा संघाच्या वतीने जत येथे साजरा करण्यात आला.     यावेळी अखिल भारतीय मराठा सेवासंघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,  काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष मोहन मानेपाटील,  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शफिक भाई इनामदार, बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष सुनील क्यातन, उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सागर तानाजी शिनगारे आदीजन उपस्थित होते.