जत नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अखेर चार उमेदवारांनी पाच अर्ज केले दाखल


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करणेच्या चौथ्या दिवसअखेर चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले असलेची माहिती जत नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिली. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल स्वीकारण्यास दि. १० नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असली तरी गेल्या तीन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराला अर्ज भरून ती प्रक्रिया पुर्ण करण्यास जास्त वेळ लागत आहे.
    सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार सोडले तर सर्वच उमेदवारांना जात पडताळणी कार्यालयाकडे कागदपत्रे सादर करून त्याची पावती घेणे व ती उमेदवारी अर्जासोबत जोडणे. उमेदवाराच्या व कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती देणे. तसेच उमेदवाराच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत नवीन बँक खाते उघडणे हे सर्व करायला उमेदवाराचा जास्त वेळ जात आहे.
    आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांचे सुपुत्र हर्षवर्धन संजय कांबळे यांनी जत नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधून नगरसेवक पदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे.
    जत नगरपरिषद प्रभाग क्र. ६ मधून भारतीय जनता पक्षाचे विक्रम शिवाजीराव ताड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रमोद डोळळी यांनी भाजप कडून एक व अपक्ष एक असे दोन अर्ज दाखल केले आहेत. तसेच अमीर नदाफ यांनीही आपला अर्ज दाखल केले आहे. १७ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून दि. १८ रोजी अर्जाची छाननी होणार आहे.
    जत नगरपरिषद ११ प्रभागातील २३ जागासाठी व नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर भाजपा कडून केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक व सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांचे नाव जवळ जवळ फायनल झाले आहे.
    जत नगर परिषदेची ही निवडणूक तिरंगी होत असली तरी राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जयंतराव पाटील गट या निवडणुकीत काय राजनीती करणार यावर युती झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे यश अवलंबून राहाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण