Posts

Showing posts from May, 2024

जत येथे अहिल्यादेवी जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;      सालाबाद प्रमाणे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्ताने जत शहरात दिनांक ३० ते ३१ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुतळा व प्रतिमा चे पूजन तसेच दिनांक २९ मे रोजी महिला महोत्सव महिलांसाठी विविध स्पर्धा, दिनांक ३० मे रोजी प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन व ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व सायंकाळी भव्य मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.     तरी कार्यक्रमासाठी शहरासह तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयंती उत्सव मंडळाकडून करण्यात आले आहे.

संत निरंकारी मिशनच्या वतीने जत येथे २६ मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

Image
रक्तदान जनजागृतीसाठी निरंकारी भक्तांनी जत शहरांमध्ये काढली मोटरसायकल रॅली जतवार्ता न्यूज नेटवर्क;      संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन शाखा जत यांचे वतीने रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी साई प्रकाश मंगल कार्यालय जत येथे सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असलेची माहिती संयोजकानी दीली.      सारी सृष्टी एका प्रभु परमात्म्याची निर्मीती आहे. सर्वांचा देव परमात्मा एक आहे. आणि तो सर्वांच्या घटामध्ये विराजमान आहे. मानवाची सेवा‌ हीच ईश्वराची सेवा होय या समयाच्या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे शिकवणीनुसार आध्यात्माबरोबर रक्तदान शिबीर वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, आपत्तीग्रस्तांना मदत कार्य पुरविणे यासारखे सामाजिक उपक्रम राबऊन मानवाची सेवा करीत आहेत.रक्तदान शिबिराची सुरवात सन १९८६ साली तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी पहिल्यांदा स्वता रक्तदान करुन केली आतापर्यंत जवळजवळ १३,८१,९०६ युनिटहुन अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदविलेला आहे वैज्ञानिकांनी सर्व गोष्टींमध्ये प्रगती केली पण विज्ञानाला रक्त तयार करता आले नाही म्हणू