Posts

Showing posts from June, 2023

सोरडी येथे जलजीवन मिशन नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- सोरडी ता.जत येथे जलजीवन मिशन नळपाणी पुरवठा योजनेच्या १ कोटी ६२ लाख रु.च्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते करणेत आले.       यावेळी जत तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष   अप्पाराया बिरादार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच तुकाराम गायकवाड, शिवकुमार तंगडी, हेमंत सुर्यवंशी भाऊसाहेब पाटील  राजेश भोसले, दत्ता चव्हाण माजी सरपंच, मोहन गायकवाड, चंद्रकांत दोंदले, दर्यप्पा काळे,दत्ता वाघ, विजय डिसकळ, अजिज मुल्ला, नाना कोकरे, पप्पू मोरे, विजय पाटील, अक्षय दुधाळ यांच्यासह सोरडी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-   जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस शंकरराव वगरे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी तुकाराम माळी, उत्तमराव महारणूर,रविंद्र सोलनकर,बेवणूरचे सरपंच,चंदनशिवे आदी उपस्थित होते.      यावेळी तुकाराम माळी यांनी शाहु महाराज यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा विषयी माहिती दिली.राजर्षी शाहु महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या राज घराण्यातील राधाबाई व जयसिंगराव घाडगे यांच्या पोटी झाला. नंतर ते कोल्हापूर येथील संस्थान मध्ये दत्तक झाले. दत्तक नंतर त्यांचे नामकरण शाहु असे करण्यात आले. राजर्षी शाहु महाराज सन १८९४ सालापासून राज्यकारभाराची दूरा सांभाळू लागले.त्यांनी आपल्या राजवटीत अनेक सामाजिक सुधारणा केल्या. सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण, समाजातील विविध घटकांना बोर्डींग,अस्पृश्य मुलाना असलेल्या वेगळ्या शाळा बंद करून सर्वांना एकत्र शाळा सुरू केल्या २६ जून १९०२ रोजी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना पन्नास टक्के आरक्षण सुरू केले. गंगाराम कांबळे याना हाॅटेल काढून देऊन स्वत: त्याठिकाणीं चहा

जीपच्या धडकेत दोघेजण जखमी; जत पोलिसात गुन्हा दाखल

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क :-  जत येथील महाराणा प्रताप चौकातील पेट्रोल पंपासमोर जीपने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी सात वाजता घडला. या प्रकरणी जीप चालकावर जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.        जत येथील अमित तानाजी पाटील हे दुचाकीवरून (एमएच १०- डीयू ने १७८१) पुतण्या गणेश व पुतणी स्वाती यांच्यासह पेट्रोल भरण्याकरिता बस स्थानकासमोरील पंपावर जात होते. त्याच वेळी भरधाव वेगात आलेल्या जीपने (क्र. केए २२ पी. ५१४६) दुचाकीला धडक दिली. यात गणेश व स्वाती गंभीर जखमी झाले.

देशाला शांती देण्याचे महान कार्य निरंकारी मंडळ करित आहे; उपविभाग पोलीस अधिकारी सुनील साळुंखे

Image
संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात १२६ जणांचा उत्फुर्त सहभाग जतवार्ता न्यूज नेटवर्क:- संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशनच्या वतीने बचत भवन जत येथे आयोजित रक्तदान शिबिरात १२६ भक्तांनी उत्फुर्त सहभाग घेतला.      कार्यक्रमाचे उद्घाटन जतचे पोलीस उपविभाग अधिकारी सुनील साळुंखे यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशाला शांती देण्याचे महान कार्य निरंकारी मंडळ करित आहे. आपण आज पाहतो आहे की जगामध्ये हिंसाचारापोटी अनेकांचे रक्त नाल्यामध्ये फुकटचे व्यर्थ जात आहे. निरंकारी मंडळाचा उद्देश चांगला आहे. रक्त नाल्यामध्ये न वाहता मानवांच्या नसामध्ये वाहिले पाहिजे, आजच्या काळात मंडळाच्या विचारधारेची गरज आहे. त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्यास शुभेच्छा दिल्या.        शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले. रक्तपेढीचे डॉ जगदीश कुमार रक्तदानाचे महत्त्व सांगताना म्हणाले की, एका व्यक्तीने जर रक्तदान केले तर तीन लोकांना जीवनदान मिळु शकते.  यावेळी  देवराजजी काळे, स्टेट बँकेचे शाखाधिकारी रोहित नाय

महिलांनी सक्षम बनणे काळाची गरज; आमदार विक्रमसिंह सावंत

Image
जतमध्ये 'धीरज उद्योग समूहाचे' उद्घाटन जतवार्ता न्यूज नेटवर्क:-   महिलांनी फक्त चूल आणि मूल याच्या पुढें जाऊन स्वावलंबी बनून स्वतः च्या पायावर उभं राहता आले पाहिजे. कुठुंबतील एक सदस्य म्हणून आपण ही स्वतःचं वेगळं आस्तित्व निर्माण केलं पाहिजे असे मत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी धीरज उद्योग समूहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.       साळे परिवाराने जत मधिल महिलांसाठी व्यवसाय उभारून त्यांना सक्षम करण्यासाठी समाज्यामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आम्हीही विक्रम फाउंडेशन च्या माध्यमातुन महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबविनार आसल्याचे आमदार सावंत यांनी यावेळी सांगितले.       जत शहरात महिला भगिनींसाठी घरबसल्या उद्योग व हाताला काम देणेसाठी एक नवीन संकल्पना घेऊन महिलांना सक्षम करण्यासाठी घरबसल्या पापड तयार करणेचे काम घेऊन येत आहोत, तरी जत शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या उद्योग समूहामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन धिरज उद्योग समूहाच्या संचालिका माजी नगरसेविका सौ.वनिता अरुण साळे यांनी केले आहे.       सहभागी महिलांना मोफत ५ दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर उद्योगसमूहा मा

संत निरंकारी मंडळाचे वतीने जत येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशन  दिल्ली शाखा जत येथे रविवार दिनांक २५ जुन २०२३ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत बचत भवन जत येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे तसेच निरंकारी मंडळाचे क्षेत्रिय संचालक जगन्नाथजी निकाळजे सांगली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.         रक्त संकलन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मीरज व सांगली सिव्हिल हे उपस्थितीत राहणार आहेत. विज्ञानाने सर्व काही प्रगती केली परंतु विज्ञानाला रक्त बनविता आले नाही. रक्तदान केलेने आपण एखाद्याला जिवनदान देऊ शकतो रक्तदानासारखे श्रेष्ठ असे कोणतेही दान नाही तरी या पवित्र कार्यास मोठ्या संख्येने योगदान द्यावे असे आवाहन जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे यांनी केले आहे.

माजी आमदार सनमडीकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिरामध्ये २५० हुन अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार आदरणीय उमाजीराव सनमडीकर (काका) यांची ८५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.  उपस्थित  सर्वांनी त्यांना आदरांजली वाहिली. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये काकांना आदरांजली वाहण्यात आली.       या ८५ व्या जयंतीनिमित्त कमल ऑर्थोपेडीक सेंटर,जत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे "भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन श्रीमती कमल उमाजीराव सनमडीकर यांच्या हस्ते करण्यात आले.        माजी आमदार सनमडीकर यांनी ज्याप्रमाणे जत सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये राजकीय, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, त्यांचप्रमाणे. त्यांचे चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर आणि सून डॉ.वैशाली सनमडीकर हे वैद्यकीय क्षेत्रामद्ये जत तालुक्यातील गोर गरीब, गरजू रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. आजपर्यन्त त्यांनी आपल्या हॉस्पिटल मध्ये हजारो रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करून जिवदान दिले आहे. यावेळी वय वर्षे ४० पुढील सर्वांसाठी ई.सी.जी., मधुमेह, रक्तदाब आधी समस्यांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे

शहरातील पाणीप्रश्नी रिपाइं आक्रमक | जत नगरपरिषदेस ठोकले टाळे

Image
किमान दररोज एक तास पाणी सोडण्याची मागणी जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये दररोज किमान एक तास पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी रिपाइं (आठवले गट) यांच्यावतीने मंगळवारी सकाळी जत नगरपरिषदेस टाळे ठोकण्यात आले.        जत शहराला ७६ कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही दररोज मुबलक पाणी मिळत नाही. पाण्याच्या प्रश्नासह वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा आदी मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले होते. दि. २० जून पर्यंत मागण्याची पूर्तता न केल्यास जत नगरपरिषदेस टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही व पूर्तता केली नाही. त्यामुळे कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ नगरपालिकेत आले. त्यावेळी अधिकारी नगरपालिकेत उपस्थित नव्हते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी ढेरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. जबाबदार कोणीही अधिकारी नसल्यामुळे नगरपरिषदेचे कामकाज रामभरोसे चालले आहे. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारास टाळे ठोकून निषेध व

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

Image
महाराष्ट्र राज्यातील ओबीसी राजकीय नेत्यांचे खच्चीकरण सुरू असून त्या बद्दल जागृत राहून ओबीसी जातनिहाय जनगणना आणि मंडल आयोगाच्या सर्वच्या सर्व १००% शिफारशी अमलबजावणीसाठी लढा उभारणार जतवार्ता न्यूज नेटवर्क:-          गल्ली पासून दिल्ली पर्यत महाराष्ट्र राज्यातील ओबीसी नेत्यांचे राजकिय खच्चीकरण सुरु असून सर्वांनी या अन्याया विरूध्द एकत्र येऊन लढले पाहिजे. मंडल आयोगाने १९३१ जनगणना जनसंख्येच्या अंदाजानुसार आरक्षण दिले. त्यामुळे आता न्यायालयाने वार्डनिहाय जनगणना नसल्याने आरक्षण स्थगित केले होते ,ज्या सरकारची जनगणना करण्याची जबाबदारी आहे त्यानी ती पार पाडली नाही. त्यामुळे विनाकारण देशातील बहुसंख्य ओबीसी वर्गाला वेठीस धरून केंद्र आणि राज्य सरकारने योग्य रीतीनें वेळेत आपली जबाबदारी पार पाडत नसल्याने सतत ओबीसी प्रवर्गावर अन्याय होत आहे. असे मत सागर शिनगारे यांनी व्यक्त केली. जत येथे आयोजित ओबीसी, व्हीजेएनटी,बहुजन परिषदेच्या मेळाव्यात ते बोलत होते.       यावेळी सुनिल गुरव जिल्हाध्यक्ष, तुकाराम माळी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, दिनकर पतंगे जिल्हा उपाध्यक्ष, किशोर हडदरे सचिव पलूस, सागर शिनगारे अध्यक

महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बसपाचे निवेदन; आंदोलनाचा इशारा; श्रीकांत सोनवणे

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत महावितरण कंपनीकडून शहरात पुरवला जाणार वीजपुरवठा हा वारंवार खंडित केला जातो, तसेच नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज खंडित केली जाते. त्यामुळे नागरीक व व्यापरांमडून महावितरण कंपनी विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन बसपाचे जत शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी महावितरणचे अभियंता यांना निवेदन दिले आहे.        निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये मागील २ महिन्यापासून आपल्या म.रा.वि.वि.कंपनी यांच्याकडून वारंवार ऐन कडक उन्हाळाच्या दिवसात व इतर वेळी वारंवार विद्युत पुरवठा खंडीत केली जात आहे. त्यामुळे जत शहरातील नागरीकांना आतोनात त्रास होत आहे. तसेच शाळा व महाविद्यालयीन सुट्टी असल्यामुळे शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनीनी कॉप्युटर कोर्स सुरु केले असल्याने विद्युत पुरवठा खंडीत केल्याने विद्यार्थ्यांचे कॉप्युटर क्लास बुडत आहेत व त्याचे आर्थिक व शैक्षिणीक नुकसान होत आहे. तसेच ग्रामीन भागातील नागरीक ऑनलाईन कामासाठी जत येथे आले असताना वीज नसल्यामुळे त्यांचे हि गैरसोई होत आहे. ऑनलाईन सेन्टर, ऑफीसचे क

राज्य परिवहन महामंडळाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त "जागर फाऊंडेशन"च्या वतीने महास्वच्छ्ता मोहिम | आगार प्रमुखांनी मांणले आभार

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जत येथील"जागर फाऊंडेशन" च्या वतीने महास्वच्छ्ता मोहिम राबविण्यात आले. या मोहिमे अंतर्गत जत बस स्थानक परिसर स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छ्ता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जत आगार प्रमुख सुनंदा देसाई यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जागर फाऊंडेशन जतचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे या नि आपल्या स्वयंसेवकांसह जत बसस्थानक परीसर स्वच्छ करण्यात आला.        स्वच्छ्ता मोहिमेनंतर बोलताना आगार प्रमूख देसाई म्हणाल्या, जागर फाऊंडेशन चे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण आज खऱ्या अर्थाने जत आगार परीसरातील कानाकोपरा स्वच्छ झाला आहे. यापुढेही त्यांचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे.        या स्वच्छ्ता मोहिमेत जागर फाऊंडेशन चे अरुण साळे, गोपाळ पाथरुट, बाळू कांबळे,अबास मुजावर, आनंद कांबळे, अभिनंदन साबळे,अमोल पवार,अभिषेक कांबळे, निखिल कलाल,विजय मोरे,अर्जुन चव्हाण,कृष्णा चव्हाण तसेच प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.