Posts

Showing posts from May, 2023

शहरातील एलईडी दिवे बंद; नागरिकांमधून नाराजी

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-  शहरातील विद्युत खांबावरील अनेक प्रभागातील एलईडी दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांमधून तिर्व नाराजी व्यक्त केली जात आहे. नगरपरिषद प्रशासक मात्र या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.         यामुळे अंधाराचा फायदा घेत अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावरून मोकाट जनावरे, सरपटणारे प्राण्यांचा वावर असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे. याबाबत संबंधितांना फोन केला असता ते काम माझ्याकडे नाही, मला माहित नाही, मी रजेवर आहे. अशी उडवा उडवी ची उत्तरे दिली जात आहेत.

बळीराजाने खचून न जाता जिद्दीने उभे ठाकले पाहीजे; ह.भ.प.सागर महाराज बोराटे

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:         जगाचा पोशिंदा असलेला माझा बळीराजा ,शेतकरी खचून चालला आहे.तो आत्महत्येचा विचार करत आहे.माझ्या बळीराजाने खचून न जाता आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकून जिद्दीने उभे ठाकले पाहीजे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्री.सागर महाराज बोराटे नातेपुते यांनी केले आहे.        येथील सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीत दीर्घकाळ सहाय्यक सचिव म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले बाजार समिती कर्मचारी डी.बी.जाधव व त्यांचे चिरंजीव सौरभ जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल समोरील विजापूर-गुहागर या महामार्गावर असलेल्या पार्वती कृषी केंद्र या खते, औषध व बी बियाणे या दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.       बाजारसमिती सांगलीचे सेवानिवृत्त सहाय्यक सचिव श्री.डी.बी.जाधव यांनी सुरू केलेल्या पार्वती कृषी केंद्र या दुकानाचे उद्घाटन ही ह.भ.प.श्री.सागर महाराज बोराटे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.       या वेळी सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक स्वप्नील शिंदे, जत येथील सुप्रसिद्ध उद्योजक शशिकांत काळगी,  माजी जि.प.सदस्या सौ

जत मध्ये डासांचे प्रमाण वाढले | प्रशासक सुस्त; औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह? साथीच्या रोगांची भिती

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क(जॉकेश आदाटे):        जत शहरासह उपनगरांमध्ये डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः दाट लोकवस्तीच्या परिसरात डासांमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी नाले तुंबले आहेत. गटारी अस्वच्छ आहेत. त्यामुळे उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी शहरात साथीचे आजार पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. नगरपरिषद प्रशासक मात्र सुस्त आहे. औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.          जत हे डासांचे शहर झाले आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. जत शहरासह उपनगरांमध्ये डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डासांच्या दंशामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ◆औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह:         डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रत्येक प्रभागात औषध फवारणी केली जाते. मात्र अलीकडे अनेक दिवसांपासून औषध फवारणी केली नसल्याने डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. औषध फवारणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत नगरपरिषद आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. काही ठिकाणी कागदोपत्री औषण फवारणी

जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवणार- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

Image
महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते  ध्वजारोहण जत/सांगली: सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवू. जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजनसह राज्यस्तरांवरून भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.      महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.        या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी  विजयसिंह पाटील,  जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे,