Posts

Showing posts from January, 2024

रिपाईचा विविध मागण्यासाठी जत येथे विराट मोर्चा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क :      म्हैसाळ विस्तारित योजनेतील ६५ गावांचे काम तातडीने सुरू करावेत, जत शहराला किमान एक तास रोज पाणीपुरवठा करावा, नगरपरिषदेला पूर्णवळ मुख्याधिकारी मिळावा व पालिकेचा कारभार पाण्याच्या टाकीऐवजी नगरपरिषद कार्यालयातून व्हावा, अशा मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी (दि. ३१) रोजी शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, दिव्यांग वंचितांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइंचे जत विधानसभा प्रमुख महादेव हुचगोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.      ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे. तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, दिव्यांग व वंचित घटकांतील लोक सहभागी होणार आहेत. अधिक बोलताना ते म्हणाले कृषी विभागातील अधिकारी अरेरावीची भाषा करतात. वेळेवर कामावर हजर नसतात. त्यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांची चौकशी व्हावी, जत शहरात चौकाचौकांत शौचालये व मुतारीची व्यवस्था करावी, महाराणा प्रताप चौक ते महाराष्ट्र बँकेपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करावे, भूमि

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष

Image
फटांक्यांची जोरदार अतिशबाजी व भगव्या रंगाची उधळण करित साजरा केला विजयोत्सव जतवार्ता न्यूज नेटवर्क:     मराठा समाजाचे संघर्ष योध्दे मनोज जरांगे-पाटील यांच्या संघर्षामुळे मराठा समाजाला ओ.बी.सी.मधून अरक्षण मिळाल्याचे राज्यसरकारने शासन परिपत्रकाव्दारे जाहीर केल्याने त्याचा विजयोत्सव सकल मराठा समाजाने भगव्या रंगाची उधळण करित साजरा केला.    मराठा समाजाला ओ.बी.सी.मधून अरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योध्दे  जरांगे-पाटील हे गेले कित्येक महिने संघर्ष करित होते. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात समाजजागृती करण्याचे काम केले. त्यांना सर्वत्र समाजबांधवांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. तरिही राज्यसरकार मराठा समाजाला अरक्षण देण्याकडे चालढकल करताना दिसत होते.    त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योध्दे जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी ते मुंबई असा लाखो समाजबांधवाना सोबत घेऊन न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढून सरकारची सर्व बाजूनी कोंडी केली.    मनोज जरांगेंच्या या आक्रमकपणामुळे राज्य सरकारने नमते घेत आज वाशी मुंबई येथून मुख्यमंत

शाकंभरी पोर्णीमेनिमित्त श्री.स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;    जत शहरातील राजे रामराव महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज नगर या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ महाराजांचे भव्य असे मंदिर असून श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत च्या वतीने मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.    श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री. बापूसाहेब पवार,उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, गणेश सावंत, लक्ष्मण मोरे,मोहन पवार, नारायण पवार,राघव जोशी,सदाशिव जाधव, डी.बी.जाधव, अतुल मोरे,वसंत उगळे,आदी स्वामी भक्त दर पोर्णीमेला विविध कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे आयोजन करतात.    आज गुरुवारी शाकंभरी पोर्णीमेनिमित्त श्री.स्वामी समर्थ मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा तसेच महाराजांच्या पाठीमागील बाजूस असलेली मखर विविध भाज्यांनी सजविलेली होती.    सकाळी दहा ते बारा या वेळेत रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर दुपारी येथील अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जतचे अध्यक्ष श्री.शहाजीबापू भोसले यांच्याहस्

जतमध्ये विक्रम फौंडेशनकडून महिला सबलीकरण मेळावा व मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

Image
विक्रम फौंडेशनचे युवराज निकम व राजेंद्र माने यांची माहिती जतवार्ता न्यूज नेटवर्क :      महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व.डॉ.पतंगरावजी कदम यांच्या जयंती निमित्त  व डॉ. विश्वजित कदम माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम फौंडेशन जत यांचे वतीने महिला सबलीकरण मेळावा व गरजू रुग्णासाठी भारती हॉस्पिटल सांगली यांचे वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करणेत आल्याची माहिती विक्रम फौंडेशनचे युवराज निकम व राजेंद्र माने यांनी दिली.     या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.२५ जानेवारी २०२४ रोजी भारती विद्यापीठ मुलींचे वसतिगृह जत येथे सकाळी ९ ते सायं. ४ या वेळेत करणेत आले आहे. महिला सबलीकरण मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार प्रा.अप्पासाहेब खोत व उदय माळी जिल्हा संसाधन अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्याक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.तृप्ती धोडमिसे भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील व आ.विक्रमसिंह सावंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रम

सिद्धार्थ संकुल येथे सिद्धार्थ फेस्टिवल, व्याख्यानमाला व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन; डॉ. कैलास सनमडीकर

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;      सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी व श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन, जत यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी प्रमाणे "सिद्धार्थ फेस्टिवल" अंतर्गत राजर्षी छ. शाहू महाराज स्मृती व्याख्यानमाला तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.     जत तालुक्याचे भाग्यविधाते कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर(काका) यांनी गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे या करिता जतमध्ये आश्रमशाळा सुरु करून सामाजिक, राजकीय कामाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात आपले पाऊल टाकले. आज अखेर त्यांनी आश्रमशाळा, सी.बी.एस.सी.स्कूल, पॉलीटेकनिक कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरु केले आहेत.      विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच थोर समाजसुधारक, साहित्यिक, विचारवंत यांच्याबद्दलची माहिती, त्यांचे विचार ऐकावयास मिळावे. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आजअखेर श्री.द.मा. मिराजदार, श्री. रामदास फुटाणे, श्री. वामन व्होवाल, श्री. श्रीमंत कोकाटे, श्री. गंगाधर बनबरे, श्री. रवी बजंत्री यासारखे बरेच वक्ते कार्यक्रमास लाभले होते.      सालाबाद प्रमाणे याही वर्षी

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     आठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करणारे व समाजामध्ये आज त्यांना एक आदर्शवत राजे म्हणून ओळखले जाते असे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन जत फ्रेंड सर्कल व मराठा सेवा संघाच्या वतीने जत येथे साजरा करण्यात आला.     यावेळी अखिल भारतीय मराठा सेवासंघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,  काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष मोहन मानेपाटील,  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शफिक भाई इनामदार, बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष सुनील क्यातन, उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सागर तानाजी शिनगारे आदीजन उपस्थित होते.

राजे रामराव महाविद्यालय व विवेक बसव प्रतिष्ठान,जत यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने राजे रामराव महाविद्यालय,जत येथे विवेक-बसव प्रतिष्ठान व राजे रामराव महाविद्यालय, जत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरा संपन्न झाले. प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अशोक बोगूलवार, प्रा.महादेव करेनव्वर, डॉ.अप्पासाहेब भोसले, प्रा.कृष्णा रानगर व प्रा.कुमार इंगळे यांच्या हस्ते उपस्थित टीमचे स्वागत करण्यात आले‌.      यावेळी मयुरेश्वर हॉस्पिटल व विवेक-बसव प्रतिष्ठान चे समन्वयक डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी यांनी शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना व ताणतणावाचे मनावर ओझे असताना आरोग्य निरोगी कसे ठेवावे हे समजावून सांगितले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनींचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जनरल चेकअप, बी.पी., शुगर व ऑक्सिजन पातळी व ए.सी.जी.करुन -हदयाची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुरेश्वर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी, ए.सी.जी. टेक्निशियन शहानवाज कलादगी, डॉ.निशा जमशेट्टी, डॉ.पवित्रा माळी, सहायक सचिन ऐवळे, लॅब टेक्निशियन दिलीप व्हनखंडे, सहाय्यक अनिल पटेद व

कायद्या हा सर्वांसाठी समान असतो; एपीआय वैभव मारकड

Image
   जतवार्ता न्यूज नेटवर्क;      बहुतांश कायदे जरी महिलांच्या बाजूने असले तरी कायद्यासमोर महिला आणि पुरुष समान आहेत. कायद्याचा गैरवापर केल्यास त्याच कलमाने गैरवापर करण-यास शिक्षा होते, असे प्रतिपादन जत पोलीस स्टेशन चे एपीआय श्री.वैभव मारकड यांनी केले.       ते राजे रामराव महाविद्यालयाच्या अग्रणी महाविद्यालय योजना, ग्रंथालय, भाषा विभाग, महिला सबलीकरण कक्ष, अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व जत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'महिला संरक्षण व सुरक्षा: काळाची गरज '  या विषयावर मुक्तपीठ येथे आयोजित खुल्या चर्चेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील हे होते.      यावेळी जत पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मुली मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असताना मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. पण कायद्याच्या माहिती अभावी त्याविषयी त्या बोलत नाहीत. काय

स्वामी विवेकानंदांचे व्यक्तीमत्व म्हणजे मानवी जीवनाला वेढ लावणारं व्यक्तिमत्त्व होय; डॉ.सरिता पट्टणशेट्टी

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क ;     स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्व म्हणजे मानवी जीवनाला वेड लावणारं व्यक्तिमत्व असून संपूर्ण विश्वाला चेतना देणारं आहे. स्वामी विवेकानंदाचे  विचार हे संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देऊन विचार करायला प्रवृत्त करणारे आहेत, असे प्रतिपादन डॉ.सरिता पट्टणशेट्टी यांनी केले.      ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह सोहळा व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जयंती यांच्या संयुक्त कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. प्रारंभी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.अशोक बोगूलवार यांनी आपल्या प्रस्ताविकातून विवेकानंद सप्ताह साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करून सांगितला.      स्वामी विवेकानंद हे युग प्रवर्तक असून त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे युरोपीय देश प्रभावित झाले असे सांगून डॉ.सरिता पट्टणशेट्टी पुढे म्हणाल्या की, आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. आजच्या युवकांच

अंकलगीत म्हैसाळच्या पाण्याचे पूजन करून ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू; तुकाराम बाबा महाराज, विजयकुमार चिप्पलकट्ट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;      जत पूर्व भागातील अंकलगी येथील दोन्ही तलाव कोरडेठाक पडले आहेत. गावावर दुष्काळाची भिषण छाया पडली आहे. अंकलगी गावाला तात्काळ मदत करावी तसेच विस्तारित योजना मार्गी लावावी या मागणीसाठी अंकलगी ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातील महादेव मंदिरासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, उद्योगपती विजयकुमार चिप्पलकट्टी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी अंकलगी येथील कुमार उदगेरी, सोमनाथ मैत्री, बुजरीकरसो मुल्ला, बिराप्पा कोहळळी, शिवनिंगप्पा तेली, काडाप्पा मैत्री, शंकर वाघोली, अर्जुन वालीकर, अनिल उदगेरी, रमेश जत्ती, श्रीशैल कोळी, सिद्धराम गुरव, राम चौगुले, गोपाळ माळी, सिद्धप्पा तेली, भिमुगौड बिरादार, चंद्रकांत नरुटे, महादेव बगली, शिवाजी साळुंखे, साहेबगौंड पाटील, भिमु पाटील, भिमराव काखंडकी यांच्यासह ग्रामस्थ उपोषणात मोठया संख्येने सहभागी झाले होते.    तुकाराम बाबा महाराज, उद्योगपती विजयकुमार चिप्पलकट्टी यांच्यासह उपोषणात सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या हस्ते म्

महादेव हुचगोंड यांचा रिपाई मध्ये जाहीर प्रवेश

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;      सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जत तालुका विधानसभा प्रमुख महादेव हुचगोंड हे सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रात काम करत असताना अत्यंत तळमळीने काम करणारे कार्यकर्ते असून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना गोरगरीब वंचित जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच जत तालुक्याचा पाणी प्रश्न शेतकऱ्यांची कर्जमाफी, बँकांची, कर्ज वाटप बाबतचे चुकीचे ध्येय धोरण, बेरोजगारांना उद्योग निर्मिती व रोजगार निर्मिती याबाबत वेळोवेळी आंदोलन केले असून ते तळमळीचे कार्यकर्ते आहेत. हुचगोंड यांनी रिपाई मध्ये त्यांच्या अनेक समर्थकांच्या सोबत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी मी सोपवत असल्याची माहिती माजी जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे म्हणाले.      यावेळी बोलताना हुचगोंड म्हणाले की, गोरगरीब जनता, वंचित घटक, शेतकरी, दिव्यांग यांचेसाठी मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. या सर्व वंचित घटकांच्या साठी गेली कित्येक वर्षे तळमळीने व प्रामाणिकपणे काम करणारा एक अभ्यासून नेता म्हणून माझ्या नजरेसमोर संजय कांबळे असल्यामुळे त्यांच

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत येथिल श्री.यल्लमादेवी यात्रेत येणा-या भाविकांना करावा लागणार अनेक समस्यांचा सामना

Image
 दि.८ जानेवारी २०२४ ते दि.११ जानेवारी २०२४ अखेर भरविण्यात येणार यात्रा जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत नगरिची ग्रामदेवता, महाराष्ट्र आणी उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान, नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या  श्री.यल्लमादेवीची यावेळची मार्गशीर्ष यात्रा ही दि.८ जानेवारी २०२४ ते दि.११ जानेवारी २०२४ अखेरीपर्यंत भरविण्यात येणार आहे.     श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जतच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. दि.२६ डिसेंबर पासून यात्रेत येणा-या व्यवसाईकांना जागा वाटप सुरू आहे. यात्रा अजून आठवडाभरावर येऊन ठेपली असलीतरी यात्रेत व्यवसाईक आतापासूनच येऊन आपापली दुकाने थाटत आहेत. यात्रेत मेवामिठाईची दुकाने व पाळणे यावेळी लवकरच आले आहेत. तसेच भेळवाले व हाॅटेल व्यवसाईक ही येऊ लागले आहेत.      जतची श्री.यल्लमादेवीची यात्रा ही खिलार जातीच्या जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे. या जनावरे बाजाराचे संपूर्ण नियोजन हे सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यावतीने केले जाते. सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्या वतीने यात्रेत कृषी प्रदर्शन ही भरविण्या

तुकाराम बाबांच्या संकल्पनेतून विवाह सोहळयात ५०० वृक्षांचे वाटप; संख येथील फुटाणे (सर) परिवारांचा उपक्रम

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क:-       कोरोनाचा कठीण काळ आठवा म्हणजे आपणास ऑक्सिजनचे महत्व समजून येईल. कोरोना अद्याप गेलेला नाही नव्या रुपात तो पुन्हा येतोय. कोरोना काळात जे घडले ते पुन्हा घडू नये यासाठी स्वच्छ हवा व सुंदर परिसर करण्यासाठी प्रत्येकांनी एक झाड लावून ते जतन केले तरच हे शक्य होणार आहे तेव्हा प्रत्येकांनी वृक्ष लागवड करावी असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले.      जत तालुक्यातील संख येथील श्री संत बागडेबाबा मंगल कार्यालयात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळयात वर्हाडी मंडळींना ५०० वृक्षांचे वाटप करण्यात आले. या विवाह सोहळयाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.      संख येथील बसवराज फुटाणे सर यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यात हभप तुकाराम बाबा यांनी फुटाणे परिवारांना अनावश्यक खर्चाला फाटा द्या व लग्नात आलेल्या सर्वांना विविध वृक्ष वाटप करू अशी संकल्पना मांडली. हभप तुकाराम बाबा महा