Posts

Showing posts from September, 2020

प्रशिक्षीत स्वयंसेवकांची गरज पूर्ण करण्यासाठी कोरोना कमांडो प्रशिक्षण स्तुत्य उपक्रम- पालकमंत्री जयंत पाटील

Image
सांगली : कोरोना विरूध्दच्या लढ्यासाठी सर्वात मोठी गरज स्वयंसेवकांची भासत आहे. कोरोना कमांडो प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षीत स्वयंसेवकाची गरज पूर्ण करण्याचे काम भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत आहे. त्यांचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.   राजमती भवन नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, वानलेस हॉस्पिटलचे संचालक डॉ. नथानियल ससे, एनसीसी बटालियनचे कर्नल एस. के. बालू, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्र्रीय कार्यकारणी सदस्य तथा माजी महापौर सुरेश पाटील आदि उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, कोरोना कमांडो प्रशिक्षण घेतलेल्या युवकांची मदत, जे डॉक्टर सेवा देत आहेत त्यांना मदत करण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे, त्

राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न

Image
जत वार्ता न्यूज नेटवर्क/प्रतिनिधी : येथील राजे रामराव महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्य राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक मा.अभय जायभाये हे प्रमुख उपस्थित होते.  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.अभय जायभाये बोलताना म्हणाले की, कोरोना महामारी मधे स्वयंसेवकानी आपली जबाबदारी ओळखावी व त्याप्रमाणे समाजात जनजागृती करावी असे सांगत तरुनांची या देशांत कमी नाही, परंतु या सर्व तरुनांनी आपले काम आपले श्रम करत राहिले तर नक्कीच तो तरुण काळा बरोबर टिकून राहील असे सांगितले. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वय मा ज्ञानराजा चिघळीकर हे सुध्दा उपस्थित होते. यावेळी बोलताना म्हणाले की, स्वयंसेवकांना श्रम केलेल्या लोकांचीच समाजात किंमत असते त्यासाठी स्वतः आपण श्रम करणे आवश्यक आहे असे सांगितले .ज्याप्रमाणे एखाद्या बी जमिनीत स्वताःहाला गाडुन घेते व इतरांना फळे फुले देते त्याप्रमाणे या देशातील  तरुण यांनी स्वतः स

जत पोलिस ठाण्याच्या आवारात संशयित आरोपीचा सँनिटायझर पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न

Image
                  आरोपी सुभाष वाघमोडे जत वार्ता न्यूज नेटवर्क/प्रतिनिधी : जत पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील संशयित आरोपी सुभाष राजू वाघमोडे (वय ३० रा. शंकर कॉलनी, उमराणी रोड जत) याला चोरीच्या गुन्ह्यातील चौकशीसाठी आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जत पोलिस ठाण्यामध्ये बोलावले असता त्याने चौकशीच्या भितीपोटी खिशातील सँनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न केला. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात न्हेण्यात आले. व पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवले असता त्याने कोरोना मुळे सांगली येथे जाण्यास नकार दिल्याने त्याच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत अधिक माहिती अशी की, भंगार चोरीचे साहित्य विकत घेतल्याप्रकरणी संशयित आरोपी सुभाष राजू वाघमोडे यास आज जत पोलिस ठाण्यात  चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यांच्या विरोधात यापूर्वी तिन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्याने पोलिस ठाणे आवारातच सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन वर्षाप

कोविड मुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी आराखडा तयार करा- पालकमंत्री जयंत पाटील

Image
सांगली : कोविड मुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत तपासणीसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी सत्य ती सर्व माहिती द्यावी, कोणतीही माहिती लपवू नये. कोरोनाची काही लक्षणे असल्यास अथवा काही त्रास होत असल्यास तात्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. नेहम

तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जत पूर्व भागात दाखल । तालुक्यातील ६७ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही; आ.विक्रम सावंत

Image
जत शहरातील कामे मार्गी लावणार जत/प्रतिनिधी(जतवार्ता न्यूज नेटवर्क): कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जालगिरी येथून सायफण पध्दतीने जत तालुक्याच्या पूर्व भागातील तिकोंडी साठवण तलाव क्रमांक दोन मध्ये आले असून पूर्ण क्षमतेने हा तलाव भरला आहे .यानंतर भिवर्गी तलावात पाणी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.            मानवतेच्या द्राष्टीकोनातून कर्नाटक शासनाला विनंती केल्यानंतर कर्नाटकातील जालगिरी येथून सायफन पद्धतीने पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागात सोडण्यात आले आहे. भिवर्गी तलावाचे जाँकवेल खुले करण्यात आल्यामुळे या जॅकवेलमधून करजगी , बेळोंडगी ,हळ्ळी , सुसलाद ,सोनलगी येथे शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणी गेले होते .जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६७ गावे पाण्यापासून वंचित आहेत या गावांना पाणी देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगून आमदार विक्रम सावंत म्हणाले की ,उन्हाळ्यात महाराष्ट्र सरकारने कर्नाटकाला सहा टी एम सी पाणी दिले होते त्याच्या बदल्यात पावसाळ्यात कर्नाटक सरकारने आम्हाला दीड ते दोन टीएमस

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यरत- अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर

Image
सांगली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे कोविड-19 म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे. या रूग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यरत आहे. या योजनेत दाखल झालेल्या रूग्णांच्या या रूग्णालयातील सर्व तपासण्या मोफत केल्या जातील. तसेच ज्या तपासण्या रूग्णालयात उपलब्ध नाहीत त्या देखील खाजगी प्रयोगशाळेतून या योजनेंतर्गत मोफत केल्या जातील. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली. योजनेचा लाभ घेण्यासाठी रूग्णाचे आधार कार्ड (आधार कार्ड उपलब्ध नसल्यास फोटो असलेले शासकीय ओळखपत्र उदा. पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसेन्स, मतदान ओळखपत्र इ.), रूग्णाचे नाव नमूद असलेली शिधापत्रिका (रेशनकार्ड) ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या दोन्ही ओळखपत्राची मुळ प्रत किंवा मुळ प्रतीचा कलर फोटो आरोग्यमित्रास दाखवणे आवश्यक असते. तसेच या रूग्णालयात खाट उपलब्धतेबाबत व दाखल रूग्णांची माहिती हवी असल्यास सेंट्रल कमांड सिस्टीम दुरध्वनी क्रमांक 0233-2332099 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा २४ तास (२४x७) दररोज उपलब्ध असल्याचे श्री. नणंदकर यांनी

करजगीतील वादग्रस्त रेशन दुकान परवाना रद्द करा । मागासवर्गीयांवर अन्याय; बसपा व रविदास समता परिषदेचा आंदोलनाचा इशारा

Image
रेशन दुकान परवाना रद्दसाठी जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांना कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देताना कार्यकर्ते. जत/प्रतिनिधी: करजगी ता. जत येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान अशोक रेवणसिध्द जेऊर हे चालवित असून सदर रेशन दुकानामध्ये गावातील मागासवर्गीय व इतर समाजातील लोक रेशन आणणेसाठी गेलेनंतर सदर दुकानदार धान्याचे वाटप नियमानुसार न करता तसेच अडाणी लोकांचा गैरफायदा घेऊन कमी माल देण्याबरोबरच स्थानिक बाजारातील इतर माल सक्तीने घ्यायला लावून आर्थिक लूट केली जात आहे. याचा जाब विचारल्यास महिला व जेष्ठ नागरिकांना एकेरी भाषेत व उध्दटपणे बोलुन तसेच शिवीगाळ व दमदाटी करून माझ्याविरुध्द कोठेही तक्रार करा असे बोलुन अपमानास्पद वागणूक देतात. पुढच्या महिन्यापासून दुसऱ्या गावातील रेशन दुकानातून धान्य घेऊन जाणेस सांगतात. या दुकानदाराच्या मनमानी कारभाराला येथील जनता कंटाळले असून या दुकानावर कारवाई करून परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा यासाठी जत तालुका बहुजन समाज पार्टी व गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने जतचे प्रांत व  तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा

जत येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोवीड सेंटर सुरू; आ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

Image
जत येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोवीड सेंटर सुरू; आ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील कोरणा बाधित रुग्णांना सांगली व मिरज येथे उपचारासाठी जावे लागू नये म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून समाजकल्याण वस्तीग्रह जत येथे नव्याने कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा तालुक्यातील नागरिकांना होणार आहे. अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी दिली. कोवाड सेंटरचे उद्घाटन आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर, मुख्याधिकारी मनोज देसाई, इंडियन मेडिकल असोसिएशन जत अध्यक्ष डॉ. रोहन मोदी, उपाध्यक्ष डॉ. शरद पवार, डॉ.काळगी, डॉ.गुरव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजकल्याण वस्तीगृह इमारतीत 50 ऑक्सिजनचे बेड व इतर 27 बेड 8 व्हेंटिलेटर तज्ञ डॉक्टर व कर्मचारी यांची नेमणूक करून शासनाच्या परवानगीने कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णा