Posts

Showing posts from September, 2023

जत येथे "साई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल"चे उद्घाटन

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;       जत तालुक्यातील रुग्णांना उत्तम सेवा मिळावी याकरिता सर्व सोयीनयुक्त "साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल"चे उद्घाटन प्रथम जगद्गुरु श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजी (कुडलसंगम) व श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी (कोळे) यांच्या शुभहस्ते व डॉ. रवींद्र आरळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. जत शहरासह तालुक्यातील गरजू रुग्णांना कमी खर्चामध्ये औषधोपचार व सेवा देण्याचे नियोजन या हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय मंडळाने दिली.       या उद्घाटन समारंभासाठी खासदार संजय काका पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे, सुजय उर्फ नाना शिंदे, रमेश पाटील, सुरेशराव शिंदे, आर. के. पाटील, पिराप्पा माळी, आप्पासाहेब नामद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ.सचिन लकडे, डॉ.रोहन मोदी, डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी, डॉ.महेश पट्टणशेट्टी, डॉ.सागर खाडे, डॉ.मदन बोर्गीकर, डॉ.सचिन वाघ हेही उपस्थित राहणार आहेत.        विजापूर रोड, माळी प्लॉट जत या

नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत, आनंदात व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करूया - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Image
उत्सव काळात सामाजिक सलोखा राखुया  पर्यावरण पूरक उत्सव साजरा करूया    सांगली : सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. जिल्ह्यात गणेशोत्सवाला एक वेगळी परंपरा असून यंदाचा गणेशोत्सवही शांततेत, आनंदात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करूया. गणेश मंडळांनी उत्सव काळात नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज केले.  गणेशोत्सव सण व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने खरे क्लब हाऊस येथे आयोजित शांतता समिती सदस्य व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना  जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे  यांच्यासह पोलीस व संबधित विभागाचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.  जिल्ह्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या व ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणा

श्री संत बागडेबाबा यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्य दुष्काळ निवारण साकडं व भागवत कथेचे आयोजन

Image
गुरुवारी प्रारंभ; रक्तदान शिबिर व वृक्षारोपण मोहीमचे आयोजन; तुकाराम महाराज यांची माहिती जतवार्ता न्यूज नेटवर्क:-        राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा  यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्य चिखलगी भुयार मठ येथे १४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर  दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण व सायंकाळी सात ते दहा दरम्यान श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी देवाची आळंदी येथील भागवताचार्य शिवाजी महाराज, वटंबे यांच्या उपस्थितीत भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू होणार आहे. दुष्काळ निवारण साकडंसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी श्रीमंत भागवत कथा ज्ञानज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत केले.       यावेळी मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष संजय धुमाळ, अमृत पाटील महाराज जाल्याळ, काटे महाराज, जवळा, शिवराया हत्तळी रामलिंग मेडीदार , गंगयया स्वामी, पिंटू मोरे, अनिल लोहार आदी उपस्थित होत

जत येथे स्वानंद वृद्ध सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क;      गंगाई सामाजिक सेवाभावी संस्था जत यांच्या पुढाकारातून जत येथील अबाल वृद्धांसाठी स्वानंद वृद्ध सेवा केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वृद्ध सेवा केंद्राचे संचालक मंडळी यांनी दिली. सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जत विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत डॉ. राऊत यांच्या घरासमोर सेवा केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या सेवा केंद्राचे उद्घाटन प्रमुख संचालक शरद पाटील व जलहरी शबनक वृद्धाश्रमाचे संस्थापक राजेश गडकरी यांच्या शुभहस्ते होणार आहे.      यावेळी प्रमोद पोतनीस सर, श्रीपाद जोशी सर, कु. प्रतिभा गुरव, मुराद पटेल हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हे सेवा केंद्र सुरू करण्यासाठी नरेंद्र जमगे, भारत गायकवाड, विष्णू कोष्टी, अजित शिंदे, अनिल देशपांडे, अनुराग नकाते आदींनी परिश्रम घेतले आहेत.

जत, कवठेमहांकाळ व मंगळवेढा तालुक्यात एक गाव एक गणपती अभियान राबविणाऱ्या गावांना तुकाराम बाबा देणार श्री ची मूर्ती भेट

Image
मानव मित्र संघटनेकडे १२ सप्टेंबरपर्यत नाव नोंदणी करा;  प्रशांत कांबळे, अजित कारंडे, रामचंद्र रणशिंगे यांचे आवाहन जतवार्ता न्यूज नेटवर्क;      श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही एक गाव एक मोहीम राबविणाऱ्या गावांना श्री च्या मुर्त्या मोफत भेट देणार आहेत. जत कवठेमहांकाळ व सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे तेव्हा मंडळांनी श्री संत बागडेबाबा मानव मित्राकडे येत्या १२ सप्टेंबरपर्यत नाव नोंदणी करावी असे आवाहन जत येथील  श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, रामचंद्र रणशिंगे व कवठेमहांकाळचे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे अजित कारंडे यांनी पत्रकार परिषदेत केले.       प्रशांत कांबळे, अजित कारंडे रामचंद्र रणशिंगे म्हणाले, राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य २०१० पासून तुकाराम बाबा यांनी एक गाव एक मोही

जत न्यायालयात ई फाइलिंग, फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन

Image
एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध : वकील, पक्षकारांना लाभ जतवार्ता न्यूज नेटवर्क;       बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा व जत बार असोसिएशनतर्फे इ-फाइलिंग फॅसिलिटी सेंटरचा प्रारंभ महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे चेअरमन अँड. विवेकानंद घाडगे व माजी चेअरमन अँड. मिलिंद थोबडे, जत बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. शिवशंकर खटावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जत न्यायालयाचे क. न्यायाधीश ए.को. चोगुले, सहदिवाणी न्यायाधीश ए. बी. जाधव, उपाध्यक्ष अँड.राजकुमार म्हमाणे, अँड.सचिव सागर व्हनमाणे उपस्थित होते.      भविष्यातील ई-फाइलिंगचे महत्त्व तसेच वकील, पक्षकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व नवोदित वकिलांच्या हितासाठी बार कौन्सिल प्रयत्नशील असल्याचे अॅड. विवेकानंद घाटगे यांनी सांगितले. जिल्ह्यात मिरज पाठोपाठ जत येथे इ-फायलिंग सुरू झाल्याबद्दल घाटगे यांच्या संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले. इ-फायलिंग सुविधेचा वकील पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.        यावेळी सर्व वकील व पक्षकार उपस्थित होते.

अचकनहळ्ळी येथील श्री बिसल सिद्धेश्वराची यात्रा ११ सप्टेंबर रोजी

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:        सालाबादप्रमाणे अचकनहळ्ळी (ता. जत) येथील प्रसिद्ध  श्री बिसल सिद्धेश्वर देवाची यात्रा सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी देवालय परिसरात भरत असून यानिमित्ताने धावण्याच्या, सायकलीच्या स्पर्धांसह खिलार जनावरे प्रदर्शन, धनगरी ओव्या आणि कुस्ती मैदान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.        ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता 'श्री' च्या पालखीचे आगमन होणार असून साडेअकरानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या निमित्ताने आमदार विक्रमसिंह(दादा) सावंत, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, आण्णाप्पा महारुद्र गुडोडगी (विजापूर), सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय (नाना) शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील, अभिजितदादा पटसंस्थेचे (पुणे) संस्थापक सचिव विक्रम शिंदे, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, गटविकास अधिकारी (जत पंचायत समिती) आप्पासाहेब सरगर, काँगेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग, उपविभागीय प

उसाच्या शेतीत गांजाची लागवड; एकास अटक

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;         जत तालुक्यातील बाज येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. बागेतून १९ किलो ओला गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत १ लाख ९१ हजार इतकी आहे. या प्रकरणी शेतकरी बाबू पांडुरंग खरात (वय५२) यास पोलिसांनी अटक केली आहे. जत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली.       याबाबत अधिक माहिती अशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांना एका खबऱ्याकडून बाबू खरात या शेतक-याच्या ऊस शेतीत गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील व उप विभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान घुगे, हवालदार विजय अकुल, सुनील व्हनखंडे, कॉन्स्टेबल सरगर, संतोष चव्हाण, विनोद सकटे, वाहन चालक अजित मदने, आदींनी बाज येथे सापळा रचून खरात यांच्या शेतात छापा टाकला. दरम्यान, छाप्यात १९ किलो १०० ग्राम गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरा संशयित बाबू खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

उमदी पोलीस ठाणे हदीतील रमेश खरात टोळी हद्दपार; पोलीस प्रमुखांकडून दोन वर्षासाठी कारवाई

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;       उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणाऱ्या रमेश खरात टोळीस आगामी गणेश उत्सव व नवरात्र उत्सव अनुषंगाने सांगली व सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रमेश यशवंत खरात (वय २४), तानाजी आमसिद्ध करे (वय २६), संभाजी बिराप्पा शेंडगे (वय २२ रा. सर्व तिकोंडी ता.जत) व महादेव उर्फ पप्पू म्हाळाप्पा करे (वय २० रा. भिवर्गी ता.जत) अशी संशयितांची नावे आहेत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी ही कारवाई केली.       संशयित रमेश खरात व त्याच्या सहकार्यानी उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०१९ ते २०२३ या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवुन घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, घरात घुसुन गर्दी मारामारी करुन मालमत्तेचे नुकसान करणे, बंदी आदेशाचे उल्लंघन करुन दुखापत करणे, बेकायदा बिगरपरवाना गौणखनिज चोरी करणे, महामारीच्या काळात गैरकायद्याची मंडळी जमवून, जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली कृती करुन लोकसेवक सार्वजनिक कर्तव्य पार पाडीत असताना त्यास अटकाव करून त्याचेवर बळाचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी बंदी आदेशाचा भंग करुन मारामारी करणे असे गंभीर स्वरुपा

76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान भव्य आयोजन

Image
प्रतिनिधी;       पुन्हा एकदा दृष्टीगोचर होईल शामियान्यांची सुंदर नगरी, संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथील विशाल मैदानांवर जिथे साकार होईल 28 ते 30 ऑक्टोबर, 2023 दरम्यान 76वा वार्षिक निरंकारी संत समागम आणि दृश्यमान होईल विश्वबंधुत्व आणि वसुदेव कुटुंबकमचे अनुपम स्वरूप.        हा आध्यात्मिक संत समागम सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात भव्य-दिव्य रूपात आयोजित केला जाणार आहे. या पावन संत समागमामध्ये देश-विदेशातील लाखो भाविक भक्तगण सहभागी होऊन संत समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करतानाच सद्गुरुचे साकार दर्शव व पावन आशीर्वाद देखील प्राप्त करतील.        या वर्षी निरंकारी संत समागमाचा मुख्य विषय आहे- ”शांती :  अंतर्मनातील” असा आहे. या विषयावर देश-विदेशातून सहभागी होणारे गीतकार, कवी, वक्तागण आपले शुभभाव गीत, कविता व विचारांच्या माध्यमातून व्यक्त करतील. विविध भाषांतून केलेल्या या प्रस्तुतींचा आनंद सर्व श्रोत्यांना प्राप्त होईल.         सर्वविदित आहे, की निरंकारी संत समागमाच्या पावन आगमनाची प्रतीक्षा देश-विदेशातील भाविक-भक्तगणांना असते. केव्हा एकदा हा