Posts

Showing posts from April, 2023

जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे मायलेकीची गळाआवळून हत्या

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क: - जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे संशयावरून पत्नी व १४ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आसल्याचा प्रकार सोमवारी उघडीस आला आहे. या घटनेने जत तालुक्यात एकच खळबळ उडाली. जत तालुक्यातील कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती येथे ही ह्रदयद्रावक घटना घडली. पतीनेच संशयावरुन खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसाकडून वर्तवला जात आहे. आई प्रियंका बिराप्पा बेंळुखी (वय-३२) व मुलगी मोहीणी बिराप्पा बेंळुखी (१४) असे मृत मायलेकीची नावे आहेत.       रविवारी मध्यरात्री संशयावरुन पतीनेच प्रियंका व मोहीणी या मायलेकीचा गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती येथे राहणाऱ्या बेराप्पा बेळंखी यांच्या घराजवळील झोपडीत ही घटना घडली आहे. या घटनेची वर्दी पोलिस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलिसांत दिली आहे. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकासह घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास सुरू आहे.

श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार जत येथे किर्तनाचा कार्यक्रम

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-  श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत च्या वतीने श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.श्री.बाळकृष्ण महाराज शिंदे( जावळी ) महाबळेश्वर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार यांनी दिली आहे.       श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने श्री.स्वामी समर्थ मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात. त्याचप्रमाणे दर पोर्णीमेला श्री.स्वामी समर्थ महाराजांची पहाटे अभिषेक महापूजा,त्यानंतर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होतो,दुपारी १२ वाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर पुष्पवर्षाव व त्यानंतर दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम या मंदिरात होतात.        श्री.स्वामी समर्थ महाराज मंदिर ,छत्रपती शिवाजीमहाराज नगर, आर.आर.काॅलेज पाठीमागे या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दि.१८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्री.ब

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पूर्ण तकदीने लढविण्याचा निर्धार ; श्रीशैल चौगुले यांना वाढता पाठिंबा

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालुक्यातील माडग्याळ येथील विकास सोसायटीचे संचालक सदन शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल सिद्राम चौगुले यांना सर्व घरातून वाढता पाठिंबा मिळत असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक पूर्ण ताकतीने लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.       सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माडग्याळ येथील श्रीशैल चौगुले यांनी भटक्या विमुक्त गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,  जय मल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत चौगुले, जत येथील युवा नेते डॉ. प्रवीण वाघमोडे,  सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ऐवळे तसेच जाडरबोबलाद येथील नेते विठ्ठल पुजारी यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.       जत तालुक्यातील शेतकरी यांना बाजार समितीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी व बाजार समित्या सक्षम बनवण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे मत यावेळी श्रीशैल चौगुले यांनी व्यक्त केले आहे.

सुखदेव नरळे एक सुसंस्कृत प्राध्यापक : प्राचार्य डॉ. सुरेश पाटील

Image
सेवा गौरव समारंभाच्या निमित्ताने गौरवोद्गार जतवार्ता न्यूज नेटवर्क:- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक व संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सांगितलेल्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार या ब्रीदवाक्यानुसार साडेतीन दशकापेक्षा जास्त आपली सेवा देणारे राजे रामराव महाविद्यालयातील मराठी विषयाचे जेष्ठ प्राध्यापक सुखदेव सोपान नरळे हे बापूजींच्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराचा वसा घेऊन जगणारे, एक प्रामाणिक, मितभाषी व सुसंस्कृत प्राध्यापक असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते प्रा. सुखदेव नरळे यांच्या नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित सेवा गौरव समारंभामध्ये बोलत होते. यावेळी नरळे यांच्या पत्नी, आई, कुटुंबीय, नातेवाईक व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.           आपल्या सेवा गौरव सत्काराला उत्तर देताना प्रा. नरळे यांनी आपला संपूर्ण जीवनप्रवास उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले, 'माणसाच्या आयुष्यात चांगल्या - वाईट गोष्टी घडत असतात. एक व्यक्ती म्हणून माझी जडणघण होत असतान

श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने वाहक विजय शिंदे यांचा सेवानिवृत्तीनंतर सत्कार

Image
जत वार्ता न्यूज नेटवर्क :- श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने जत एस.टी.आगाराचे वाहक विजय शिंदे यांचा सेवानिवृत्तीनंतर सत्कार करण्यात आला.       जत एस.टी.आगारात  वाहक म्हणून कार्यरत असलेले श्री.विजय सोपान शिंदे हे त्यांच्या तीस वर्षाच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे वडिल कै.सोपान शिंदे हे ही एस.टी.आगारात चालक होते. श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत च्या वतीने विजय शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाल,श्रीफळ देऊन व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.       या वेळी श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे,मराठा ग्रामीण बिगर शेती सह. पत.संस्थेचे चेअरमन श्री.गणेश सावंत आदी उपस्थित होते.