Posts

Showing posts from March, 2025

जत तालुक्याच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी घंटानाद आंदोलन : विक्रम ढोणे

Image
जतवार्ता न्यूज नेटवर्क;     जत तालुका विस्ताराने मोठा असून राज्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत जत तालुका विकासाच्या बाबतीत मागास असून तो विकासात अग्रभागी होण्यासाठी तालुक्यातील प्रमुख प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी लक्षवेधी घंटानाद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिली.     जत तालुका विभाजन, तालुक्यातील प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून ती पूर्ण क्षमतेने भरावीत,कृषी योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्यावे, जत एमआयडीसी मध्ये सुविधा उपलब्ध नवे उद्योग येण्यासाठी उद्योजकांना निमंत्रित करावे.प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांची स्थगिती उठवून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांना मंजुरी द्यावी, जत शहरातील शेतकऱ्यांसाठी मनरेगा कक्ष जत नगरपालिकेकडे स्थापन करून शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी.उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देऊन कामकाज सुरुवात करावी.यासह अन्य प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशामध्ये तालुक्यातील प्रश्नांची चर्चा घडून...