Posts

Showing posts from December, 2023

कै. श्रावण पाथरूट यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली

Image
  जत,सांगली:-      जत शहरातील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते व ज्यांनी शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी तसेच शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले ते शिवसेनेचे शहर प्रमुख कै. श्रावण पाथरूट यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त जत येथील समता मित्र मंडळाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.       यावेळी अशोक धोत्रे, अनिल हेसी, संतोष राजुरे, सुनील कोळी, खंडू पाटील, जावेद शेख, शंकर पवार, संजय जाधव, बाबा शिंदे, अभिषेक पाथरुट, मंगल सिंग, बाबू चौधरी, पिंटू पाथरुट, सचिन जाधव, चंदू कोळी, शफिक जमखानवाले, पांडू साळे, ओंकार पाथरुट, मोहन मानेपाटील, शाफिक इनामदार, लक्ष्मण पाथरुट यांच्यासह समता चौक मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होता.

लाक्षणिक आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे- हभप तुकाराम बाबा महाराज

Image
  जतवार्ता न्यूज नेटवर्क:-        जत तालुक्यातील भयावह दुष्काळकडे शासन, प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष, रखडलेली म्हैसाळ योजना, रेंगाळलेली विस्तारित म्हैसाळ योजनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या १४ डिसेंबर रोजी गुरुवारी जत तहसिल कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी, विविध सामाजिक संघटनेनी सहभागी व्हावे असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.        तुकाराम बाबा म्हणाले, यंदा पावसाने घरी दिल्याने जत तालुक्यातील परिस्थिती बिकट झाली आहे तालुक्यात भयावह दुष्काळ पडला आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने ३० हुन अधिक टँकर सुरू आहेत. जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडलेला असताना  मायबाप शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जय तालुक्यातील दुष्काळाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली समोर आंदोलन केले त्याचबरोबर राज्याचे कामगार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन दुष्काळाबाबत उपाययोजना कराव्यात अशी माग

मोफत अभा व गोल्डन कार्ड अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

Image
युवा नेते परशुराम भैया मोरे युवा मंचचा उपक्रम  जतवार्ता न्यूज नेटवर्क;       विठ्ठलनगर ता जत येथे वार्ड क्र १ येथे ३ डिसेंबर रोजी युवा नेते परशुराम भैय्या मोरे यांचे कार्यालयात मोफत आयुष्मान भव कार्ड/गोल्डन कार्ड व ABHA आभा कार्ड आभियान सुरु केले होते. या अभियानाला जत शहरांतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.या मध्ये गोल्डन कार्ड २९० व आभा कार्ड ३२० कार्ड काढण्यात आले.      यावेळी बोलताना युवा नेते परशुराम मोरे यांनी गोर गरीब नागरिकांनी मोठ्यप्रमाणावर या मोफत योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. आयुष्मान भारत कार्ड/ गोल्डन कार्ड  उद्देश - आयुष्मान भारत कार्ड हे लाभार्थ्यांना कॅशलेस हेल्थकेअर सपोर्ट आहे. पात्रता - आयुष्मान भारत कार्ड हे केवळ वंचितांसाठी आहे आणि SECC द्वारे ओळखले जाते. फायदे - आयुष्मान कार्ड मोफत गंभीर आरोग्य सेवा प्रदान करतात. संरक्षण - आयुष्मान कार्ड प्रति कुटुंब वार्षिक ₹5 लाखांपर्यंत कव्हर करते. उत्पन्न गट - आयुष्मान कार्ड हे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. नावनोंदणी - लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड अनिवार्य आहे. ABHA हेल्थ आयडी चे फायदे -       ABHA हेल्थ आयडी हा आरोग्