मोफत अभा व गोल्डन कार्ड अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

युवा नेते परशुराम भैया मोरे युवा मंचचा उपक्रम 


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
      विठ्ठलनगर ता जत येथे वार्ड क्र १ येथे ३ डिसेंबर रोजी युवा नेते परशुराम भैय्या मोरे यांचे कार्यालयात मोफत आयुष्मान भव कार्ड/गोल्डन कार्ड व ABHA आभा कार्ड आभियान सुरु केले होते. या अभियानाला जत शहरांतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.या मध्ये गोल्डन कार्ड २९० व आभा कार्ड ३२० कार्ड काढण्यात आले.
     यावेळी बोलताना युवा नेते परशुराम मोरे यांनी गोर गरीब नागरिकांनी मोठ्यप्रमाणावर या मोफत योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे.

आयुष्मान भारत कार्ड/ गोल्डन कार्ड 
उद्देश- आयुष्मान भारत कार्ड हे लाभार्थ्यांना कॅशलेस हेल्थकेअर सपोर्ट आहे.

पात्रता- आयुष्मान भारत कार्ड हे केवळ वंचितांसाठी आहे आणि SECC द्वारे ओळखले जाते.
फायदे- आयुष्मान कार्ड मोफत गंभीर आरोग्य सेवा प्रदान करतात.
संरक्षण- आयुष्मान कार्ड प्रति कुटुंब वार्षिक ₹5 लाखांपर्यंत कव्हर करते.
उत्पन्न गट- आयुष्मान कार्ड हे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत.
नावनोंदणी- लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड अनिवार्य आहे.

ABHA हेल्थ आयडी चे फायदे -
      ABHA हेल्थ आयडी हा आरोग्य नोंदी डिजिटल पद्धतीने ऍक्सेस करण्याचा आणि शेअर करण्याचा एक मार्ग आहे.डिजिटल ABHA हेल्थ आयडी सर्वांसाठी उपलब्ध आहे.ABHA कार्ड ही एक अद्वितीय आरोग्य सेवा ओळख आहे जी तुमचा वैद्यकीय रेकॉर्ड संग्रहित करते.
ABHA कार्ड हे वैद्यकीय अहवालांचे अमर्यादित डिजिटल स्टोरेज आहे. ABHA कार्ड भारतातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे. ABHA कार्ड ऐच्छिक आहे.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड