प्रत्येक कुटुंबाने ५ झाडे लाऊन त्याची किमान ३ वर्ष जोपासणी केली पाहिजे; आमदार विक्रमसिंह सावंत
जतवार्ता न्यूज नेटवर्क; दुष्काळ सारख्या भयानक परिस्थितीचा सामना करायचा असेल तर जास्तीत जास्त झाडे लावने गरजेचे आहे. आज पाहायला गेले तर उन्हाळ्यात तापमान ४१ अंशाच्या वरती गेल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. एकीकडे पाऊसाचे प्रमाण कमी झालेले आहे. आपला जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणुन ओळखले जाते. यावर आपणाला मात करायची असेल तर प्रत्येक कुटुंबाने कीमान ५ वृक्ष लागवड करुन त्यांचे किमान ३ वर्ष जोपासणा केली पाहिजे. असे अहवान ग्रामपंचायत रामपुर ग्रुप मल्लाळ पंचायत समिती जत तसेच गवि सिध्देश्वर ट्रस्ट यांचे सहकार्याने आयोजित गविसिध्देश्वर मंदिर रामपुर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. ते पुढे म्हणाले की, आम्ही शासकीय जागेवरतीही शासनाच्या व तालुक्यातील विविध आध्यात्मिक व सामाजिक संस्थांच्या मदतीने ५० हजार झाडे लाऊन ते मोठे होईपर्यंत किमान ३ वर्ष जोपासणा करण्याचे नियोजन केले आहे. या अभियान मध्येही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रामपुर ग्रुप मल्लाळ गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती पवार म्हणाले की. आमदार