जत नगरपरिषदेकडून करवाढ रद्द न केल्यास शुक्रवारी जत बंद
- Get link
- X
- Other Apps
शहर सुधार कृती समितीचा इशारा : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत नगरपरिषद हद्दीतील मिळकत मालमत्तांची चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेली करप्रणाली रद्द करावी, या मागणीसाठी जत शहर सुधार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. करवाढ रद्द न केल्यास शुक्रवार, दि. २१ जून रोजी जत शहर बंदचा इशारा समितीने दिला आहे.
करवाढ विरोधात जत शहर सुधार कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, जत नगरपरिषदेने नागपूर येथील खासगी संस्थेमार्फत जत नगरपरिषद अंतर्गत मिळकत मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे. हे सर्वेक्षण चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने केले आहे. शहरातील नागरिकांना याचा आर्थिक फटका दरवर्षी बसणार आहे. सदरचे सर्वेक्षण करत असताना जत शहरातील नागरिकांना विचारात न घेता सर्वेक्षणाचा अहवाल अंमलात आणण्याच्या नोटिसा मुख्याधिकारी यांनी जनतेला बजावल्या आहेत. सदर करप्रणाली त्वरित रद्द करुन पूर्वीप्रमाणे करप्रणाली लागू करण्यात यावी.
निवेदनावर प्रभाकर जाधव, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे, माजी उपनगराध्यक्ष आप्पासो पवार, उबाठाचे संपर्क प्रमुख अमित दुधाळ, विश्वनाथ शिंदे, चंद्रशेखर गोब्बी, डॉ. मदन बोर्गीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment