प्रत्येक कुटुंबाने ५ झाडे लाऊन त्याची किमान ३ वर्ष जोपासणी केली पाहिजे; आमदार विक्रमसिंह सावंत

 


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    दुष्काळ सारख्या भयानक परिस्थितीचा सामना करायचा असेल तर जास्तीत जास्त झाडे लावने गरजेचे आहे. आज पाहायला गेले तर उन्हाळ्यात तापमान ४१ अंशाच्या वरती गेल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. एकीकडे पाऊसाचे प्रमाण कमी झालेले आहे. आपला जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणुन ओळखले जाते. यावर आपणाला मात करायची असेल तर प्रत्येक कुटुंबाने कीमान ५ वृक्ष लागवड करुन त्यांचे किमान ३ वर्ष जोपासणा केली पाहिजे. असे अहवान ग्रामपंचायत रामपुर ग्रुप मल्लाळ पंचायत समिती जत तसेच गवि सिध्देश्वर ट्रस्ट यांचे सहकार्याने आयोजित गविसिध्देश्वर मंदिर रामपुर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. 
    ते पुढे म्हणाले की, आम्ही शासकीय जागेवरतीही शासनाच्या व तालुक्यातील विविध आध्यात्मिक व सामाजिक संस्थांच्या मदतीने ५० हजार झाडे लाऊन ते मोठे होईपर्यंत किमान ३ वर्ष जोपासणा करण्याचे नियोजन केले आहे. या अभियान मध्येही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
   यावेळी रामपुर ग्रुप मल्लाळ गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती पवार म्हणाले की. आमदार सावंत यांच्या माध्यमातुन किल्ले रामपुर येथे पर्याटन विकास मधुन ४.७०कोटी मंजूर झाले आहेत. गवि सिध्देश्वर मंदीराचाही शासनाच्या 'क' वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजनेमध्ये समावेश झालेला आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून गाव तलाव पाईपलाईन करुन पाणी सोडणेचे कामही सुरू आहे. जलजिवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कामही अंतिम टप्प्यात आलेले आहे. गावातील विविध वाडी वस्तीसाठी रस्ते करण्यात आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून गावाकरिता कोट्यवधीचा निधी गावाला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. गवि सिध्देश्वर रस्ता स्वताच्या आमदार फंडातून मंजूर करण्याचे जाहीर केले. त्यांचे गावाच्या वतीने सरपंच या नात्याने मी मनापासुन आभार मानतो आहे.
   कार्यक्रमास पंचायत समिती जत चे माजी सभापती बाबासाहेब कोडग, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मिनाक्षीताई अक्की, मार्केट कमिटी माझी संचालिका सौ भाग्यश्री पवार, धानम्मा दूध संस्थेचे संचालक रावसाहेब मंगसुळी, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, जत बसपा अध्यक्ष श्रीकांत सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी जगताप साहेब, नायब तहसीलदार धोडमाळ, कृषी विस्तार अधिकारी टि व्ही संकपाळ, बाळासाहेब हुंचाळकर, राजु यडगोंड, पुजारी विजय यडगोंड, सुरेश गोब्बी, शरणाप्पा अक्की, डॉ विवेकानंद राऊत,दिलीप सोलापुरे, मोहन माने पाटील यांचेसह मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलकर्णी सर यांनी केले आभार रामपुर गावचे सरपंच मारुती पवार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष