बळीराजाने खचून न जाता जिद्दीने उभे ठाकले पाहीजे; ह.भ.प.सागर महाराज बोराटे

जतवार्ता न्यूज नेटवर्क: 
       जगाचा पोशिंदा असलेला माझा बळीराजा ,शेतकरी खचून चालला आहे.तो आत्महत्येचा विचार करत आहे.माझ्या बळीराजाने खचून न जाता आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकून जिद्दीने उभे ठाकले पाहीजे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्री.सागर महाराज बोराटे नातेपुते यांनी केले आहे.
       येथील सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीत दीर्घकाळ सहाय्यक सचिव म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले बाजार समिती कर्मचारी डी.बी.जाधव व त्यांचे चिरंजीव सौरभ जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल समोरील विजापूर-गुहागर या महामार्गावर असलेल्या पार्वती कृषी केंद्र या खते, औषध व बी बियाणे या दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
      बाजारसमिती सांगलीचे सेवानिवृत्त सहाय्यक सचिव श्री.डी.बी.जाधव यांनी सुरू केलेल्या पार्वती कृषी केंद्र या दुकानाचे उद्घाटन ही ह.भ.प.श्री.सागर महाराज बोराटे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
      या वेळी सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक स्वप्नील शिंदे, जत येथील सुप्रसिद्ध उद्योजक शशिकांत काळगी,  माजी जि.प.सदस्या सौ.मिनाक्षी अक्की, स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, मराठा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादीत जत चे चेअरमन गणेश सावंत, व्हा.चेअरमन श्रीकृष्ण पाटील, मोहन पवार, अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष शहाजी (बापू) भोसले, सदाशिव जाधव, दुर्वा एजन्सीचे दिपक पाटणकर, पिंटु मोरे ,सुरेश कांबळे, सोमनिंग चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. 
      यावेळी प्रबोधन करताना ह.भ.प. सागर महाराज बोराटे पुढे म्हणाले, जाधव परिवाराने आपल्या दुकाणाच्या शुभारंभाची सुरूवात ही किर्तनरूपी सेवेतून केली आहे. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने धेतला पाहीजे. मानवाने आपणाला मिळालेल्या संपत्तीतून थोडी संपत्ती दान करून परमार्थ साधावा असे आवाहन ही केले. जाधव आपल्या कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना चांगली सेवा द्यावी असे आवाहन करूण पार्वती कृषी केंद्र हे दुकान लवकरच चांगले नावलौकीक मिळवेल असा आशिर्वाद दिला.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड