जत मध्ये डासांचे प्रमाण वाढले | प्रशासक सुस्त; औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह? साथीच्या रोगांची भिती

 


जतवार्ता न्यूज नेटवर्क(जॉकेश आदाटे):
       जत शहरासह उपनगरांमध्ये डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः दाट लोकवस्तीच्या परिसरात डासांमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी नाले तुंबले आहेत. गटारी अस्वच्छ आहेत. त्यामुळे उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी शहरात साथीचे आजार पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. नगरपरिषद प्रशासक मात्र सुस्त आहे. औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
         जत हे डासांचे शहर झाले आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. जत शहरासह उपनगरांमध्ये डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डासांच्या दंशामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
◆औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह: 
       डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रत्येक प्रभागात औषध फवारणी केली जाते. मात्र अलीकडे अनेक दिवसांपासून औषध फवारणी केली नसल्याने डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. औषध फवारणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत नगरपरिषद आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. काही ठिकाणी कागदोपत्री औषण फवारणी दाखवली जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत. स्वच्छता निरीक्षकांपासून मुकादम यांच्या आशिर्वादाने हा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.
◆साथीच्या रोगांची भिती;
       शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. डासांमुळे साथीचे रोग पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. ताप- थंडीच्या व रक्तातील पेशी कमी होणे आशा रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे. पालिका प्रशासनाने डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
◆ जागर फाउंडेशन कडून औषध फवारणी; परशुराम मोरे
    शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांसह नागरिकांना डेंगू, मलेरिया व पेशी कमी होणे असे आजार उद्भवत आहेत. याबाबत औषध फवारणी करण्यासाठी नगरपरिषदेला वारंवार सांगून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे येत्या दोन दिवसात जागर फाउंडेशन कडून औषध फवारणी करण्यात येणार असल्याचे जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी सभापती परशुराम मोरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष