काँग्रेस पक्षाचे वतीने जत येथे आगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा
जतवार्ता न्यूज नेटवर्क:
जत येथे काँग्रेस पक्षाचे वतीने महात्मा गांधी आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून आगस्ट क्रांतीदिन आणि जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की, ब्रिटिशांनी देशावर १७५ वर्षे राज्य केले आणि ब्रिटिशांना देशातून हाकलून लावण्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी २८ डिसेंबर १८८५ रोजी आजचा काँग्रेस पक्ष म्हणजे राष्ट्रीय महासभा याची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर १९२० सालापासून स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांचेकडे गेल्याने ७ आगस्ट १९४२ रोजी मुंबई येथील गवालिया टँक मैदानात काँग्रेस पक्षाचे अधिवेशनात ८ आगस्ट १९४२ "छोढो भारत" आंदोलनाची घोषणा होऊन 'करेंगे यामरेंगा' हा नारा देण्यात आला आणि ८ आगस्ट रोजी रात्री महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू सह सर्वांना अटक करण्यात आली. त्यामुळे ९ आगस्ट १९४२ जनतेने आंदोलन आपल्या हातात घेतले त्यामुळे ९ आगस्ट हा आगस्ट क्रांतीदिन म्हणून पाळला जातो. तसेच हे आंदोलन जयप्रकाश नारायण, एस.एम.जोशी आदी नेत्यांनी भूमिगत राहून चालविले म्हणून ब्रिटिशांना भारत देशाला १५ आगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य द्यावे लागले.
९ आगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळला जातो. आदी म्हणजे पूर्वी पासून वास वासत्यव किंवा निवास म्हणजे मूळनिवाशि हा समाज जंगलात म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहतो म्हणून यांचे निसर्गावर फार मोठे प्रेम असते वेषभूशा नृत गाणे निसर्गा प्रमाणे असतात. समाजाची उपजिविका जंगलातील कंदमुळे, फळे,फुले,मद,लाकूड आदी वर असते. संयुक्त राष्ट्र संघाने ९ आगस्ट १९८२ रोजी जिनिव्हा येथे जगभरातील आदिवासींची परिषद घेतली. म्हणून ९ आगस्ट १९९४ पासून जागतिक आदिवासी दिवस पाळला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यानी लढा दिला त्यामध्ये बिरसा मुंडा यांचे नाव अग्रगण्य आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील खुंटी जिल्ह्यातील उलिहातो या गावात १५ नोव्हेंबर १८७५ रोजी गुरुवारी म्हणजे (बृहस्पतिवार )झाला. म्हणून त्यांचे नाव बिरसा ठेवण्यात आले. लहानपणी त्यांनी आपले गुरु जयपाल नाग यांचेकडून शिक्षण घेतले. बिरसा मुंडा अतिशय बुध्दीमान असल्याने त्यांना पुढील शिक्षण जर्मन मिशनरी स्कूल मध्ये घ्यावे लागले. त्यासाठी त्यांना ख्रिस्ती धर्म स्विकारावा लागला आणि त्यांचे नाव डेव्हिड मुंडा असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर बिरसा मुंडा यांना शाळेतून काढून टाकण्यात आले पुढे छोटा नागपूर येथे सुरु असलेल्या सरदार आंदोलन मध्यें भाग घेतला. बिरसा मुंडा हे अतिशय बुध्दीमान आणि ज्ञानवान होते त्यांनी त्याकळात पसरलेले साथीचे रोग आणि दुष्काळ यामध्ये जनतेला मदत केली म्हणून आदिवासी समाज त्यांना भगवान मानू लागला. ब्रिटिशांनी १८८२ साली केलेल्या वन कायद्याला बिरसा मुंडा यांनी प्रखर विरोध केला. ब्रिटिश भारतात आले तेंव्हा त्यांच्या हातात बायबल तर वन जमीन आदिवासी यांच्या हातात होत्या. नंतर बायबल आदिवासी यांच्या हातात तर वन जमीन ब्रिटिशांचा हातात गेल्या. अलगुलान म्हणजे वाटेल ते करण्यास तयार रहा अशी घोषणा देण्यात आली. १८९४ मध्यें त्यांनी ब्रिटिशांना सळोकि पळो करून सोडले. १८९५ साली त्यांनी ख्रिस्ती धर्म सोडला. बिरसा मुंडा यांचे पुढे ब्रिटिशांना बर्ऱ्याच वेळा हार पत्करली. १८९५ साली ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांना अटक करून तुरुंगात डांबले आणि १८९७ साली सोडून दिले. परत १९०० साली बिरसा मुंडा यांना ब्रिटिशांनी पकडले आणि ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा तुरंगात मृत्यू झाला अवघ्या २५ वर्षे वयात बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशां विरुद्ध क्रांती केली. आजही झारखंड मध्यें रांची विमान तळास बिरसा मुंडा यांचे नांव देण्यात आले आहे.
जागतिक आदिवासी दिना निमित्य बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. बाबासाहेब तात्या कोडग, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, बसवराज बिराजदार,माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे, परशुराम मोरे,ओबीसी संघटनेचे नेते तुकाराम माळी, सरपंच राम सरगर, नितीन तोरवे, निलेश बामणे, महादेव कोळी, मुन्ना पखाली, बसवराज चव्हाण, रावसाहेब मंगसुळी, सेवादलचे अध्यक्ष मोहन माने-पाटील, दिनेश जाधव, जत तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवकुमार तंगडी, अण्णा अंगडी, विशाल कांबळे, प्रमोद कोळी नारायण जगताप, वसंत जाधव, चेतन कलाल, समाधान ओलेकर, सागर वाघमोडे व सर्व पदाधिकारी, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment