आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक उत्साहात संपन्न


जतवार्ता न्यूज नेटवर्क: 

    जत येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष्याच्या वतीने एक महत्वपूर्ण बैठक पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाबरोबरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यात आली.
    या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर युवकांशी थेट संवाद साधून नवीन शाखा स्थापन करणे, सक्रिय कार्यकर्ते तयार करणे, तसेच गाव ते शहर अशा सर्व स्तरांवर पक्षाचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात आला.
    बैठकीस तालुका अध्यक्ष सचिन होर्तीकर, कार्याध्यक्ष विश्वजित सुर्यवंशी, राजेसाहेब डफळे, नजीर पटेल, श्रीधर हिरगोंड, महादेव बगली, संतोष शिंदे, सागर लट्टी, सुरेश मधभावी, तानाजी शिंदे, राजकुमार आमगौडर, चंद्रकांत माशाळ, अमसिद्ध पुजारी, इम्रान गवंडी आणि संजय कराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    बैठकीत युवकांचा पक्षात अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम, कार्यशाळा आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकांमध्ये युवकांना संधी देणे, प्रचार यंत्रणा मजबूत करणे आणि सामाजिक प्रश्नांवर थेट काम करणे यावर एकमताने ठराव घेण्यात आला. या बैठकीचे यशस्वी आयोजन आणि नियोजनबद्ध पुढील टप्प्यांचे नियोजन लवकरच तालुकावार राबवले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन