जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा


जत/प्रतिनिधी; 
   जत येथील श्री.स्वामी समर्थ मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
   येथिल राजे रामराव महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या राजे शिवाजीमहाराज नगर येथे श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतच्या वतीने गेली तीन वर्षी झी.टी.व्ही.प्रस्तुत 'गजर किर्तनाचा, सोहळा आनंदाचा" या किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामाध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, त्याची गरज व अध्यात्मिक प्रबोधन करण्यात येते. गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या झी.टी.व्ही.प्रस्तुत कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष असून श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री.अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, मोहन पवार, सदाशिव ( दादा  ) जाधव, गणेश सावंत, अतुल मोरे, शहाजीबापू भोसले, दादासाहेब जाधव, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे, राजनंदीनी पवार, समर्थ पवार यांच्या सहकार्याने या संपूर्ण कार्यक्रमाचे योग्य असे नियोजन केले जात आहे.
    आजपर्यंत या किर्तन महोत्सवात ह.भ.प.केशव महाराज उखळीकर, ह.भ.प. सागर महाराज बोराटे, ह.भ.प.गिरी महाराज, ह.भ.प.संगीताताई चोपडे, ह.भ.प.श्री.प्रशांत ठाकरे, ह.भ.प.गीतांजलीताई झेंडे यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांनी आपले किर्तन सादर केले आहे.
   स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यामार्फत सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.बुधवारी श्री.स्वामी समर्थ महाराजांचा चतुर्थ वर्धापनदिन असल्याने पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक महापूजा,दुपारी श्री.स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पण करण्यात येऊन त्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
    स्वामी समर्थ मंदिराच्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त श्री.स्वामीसमर्थ मंदिराचे शिखरावर अकर्षक अशी विध्दूत रोषणाई करण्यात आली होती.तसेच संपूर्ण मंदिर झेंडूच्या फुलानी सजविण्यात आले होते.मंदिरात विविध फुलांचा गालीचा बनवून त्यावर श्री स्वामी समर्थ असे फुलांत तयार केले होते. ही सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
    यावेळी स्वामी सेवक शशिकांत काळगी, अनिल पोरे, सोमनाथ चौधरी, अजय शिंदे, तानाजी भोसले, तानाजी कदम, तानाजी भोसले, अनिल पवार, तानाजी काशीद, दिनकर पतंगे, सहदेव माळी, दिनराज वाघमारे, दिलीप पाटील, रमेश माळी, पापा भोसले आदींसह शेकडो भक्तांनी श्री.स्वामींचे दर्शन घेतले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन