जत यल्लमादेवी यात्रेत कृषी व खिलार जनावरे प्रदर्शनाचे आयोजन; सभापती सुजय शिंदे

जतवार्ता न्यूज नेटवर्क; सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यावतीने जत येथील यल्लमादेवी यात्रेत कृषी प्रदर्शन व खिलार जनावरे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये विविध कृषीपुरक दुकाने लावण्यात येणार असून या प्रदर्शनाला पशुपालक शेतकरी व यात्रेकरूंनी भेट द्यावी असे आवाहन सांगली कृषीउत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुजय शिंदे यानी माध्यमांशी बोलताना केले. सुजय शिंदे म्हणाले जत येथील यल्लमादेवी ही श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान आहे. नवसाला पावणारी व जागृत असलेली देवी म्हणून या देवीकडे पाहीले जाते. खिलार पशुसांठी यात्रा प्रसिद्ध असून या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील व्यापारी जनावरांच्या खरेदीसाठी येत असतात. जनावरांच्या खरेदी-विक्रीतून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते. जनावरांचा बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्यामार्फतच करण्यात येते. पूर्वी जनावरांच्या बाजारासाठी व यात्रेकरीता तत्कालीन जिल्हान्यायदंडाधिकारी यांनी एकूण दिडशे एकर जागा...