अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सुखदेव ऐवळे
जत/प्रतिनिधी;
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सुखदेव ऐवळे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
आपण यापुढील काळात सर्वसामान्यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून सर्वसामान्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षा निवडीचे पत्र देताना प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment