शिवाजी विद्यापीठाच्या विभागिय स्पर्धेत राजे रामराव महाविद्यालयाचे यश



जत/प्रतिनिधी;
      शिवाजी विद्यापीठ अंतर्गत  विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे संपन्न झालेल्या विभागिय मैदानी स्पर्धेत राजे रामराव महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
      महाविद्यालयातील राहील कमलसाब नदाफ बी.ए.भाग- 1 मधील विद्यार्थ्यांने गोळा फेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक तर भालाफेक या खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. श्री.सुशांत प्रकाश शिंगाडे बी.सी.ए. भाग 2 मधील विद्यार्थ्यांने लांब उडी या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. कुपूजा वाघमोडे बी.ए.भाग 2 मधील विद्यार्थिनीनी 200 मीटर रन या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. कु अनिता मोरे बी.सी.ए. भाग 2, कु.पूजा वाघमोडे बी. ए.भाग-2 कु.सुजाता कांबळे बी.ए. भाग -3 कु.सुवर्णा सावंत बी एस्सी भाग 2 मधील विद्यार्थिनींनी 4×400 रिले  या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. कु.सुवर्णा सावंत बी.एस्सी भाग- 2 मधील विद्यार्थिनींने 5000मी रन या क्रीडा प्रकारात चतुर्थ क्रमांक पटकावला आणि कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय मैदानी स्पर्धेसाठी तिची निवड झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, शारिरीक शिक्षण संचालक प्रा.अनुप मुळे, प्रा. दीपक कांबळे व ज्युनियर विभागाचे क्रीडाशिक्षक प्रा. अभिजीत चव्हाण  यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन