"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    राजे रामराव महाविद्यालय, जत येथे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या संकल्पनेतून "एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" हा नवोपक्रम सुरू करण्यात आला. प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांचा वाढदिवस पारंपारिक पद्धतीने साजरा न करता महाविद्यालयाच्या विस्तीर्ण अशा 25 एकर परिसरात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या हस्ते एक वृक्ष लावून वाढदिवस साजरा करण्याचा नवोपक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सुरु करण्यात आला. यापूर्वीही महाविद्यालयात एक तास ग्रंथालयात, मुक्तपीठ यासारखे नवोपक्रम सुरू सुरू करण्यात आले आहेत. आणि ते उपक्रम विद्यार्थी प्रिय झाले आहेत. या योजनेचे समन्वयक म्हणून स्टाफ सेक्रेटरी डॉ.प्रकाश सज्जन व डॉ.पुंडलिक चौधरी हे काम पाहणार आहेत.
     प्रा.धनंजय वाघमोडे, प्रा.कृष्णा रानगर, डॉ.शंकर गावडे, प्रा.सचिन लोखंडे, डॉ.यादवराव मोरे व प्राध्यापिका सौ.शिल्पा पाटील यांचा वाढदिवस महाविद्यालयाच्या अमृतवन व आंबा बागेत वृक्षारोपण करून सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. 
     यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, सर्व सजीव प्राण्यांमध्ये फक्त मानव प्राणी हाच वृक्षतोड करून पर्यावरणीय जैव विविधतेच्या साखळीला हानी पोहचवितो त्यामुळे प्रचंड तापमान वाढीशी सामना करावा लागत आहे. आपणास आनंदाचा मोकळा श्वास घ्यायचा असेल आणि  मानव प्राण्याच्या भावी पिढीला शुद्ध ऑक्सिजन पाहिजे असेल तर  वृक्षवेली, पशूपक्षी यांच्या शिवाय पर्याय नाही. म्हणून पर्यावरणीय संरक्षणाचाच एक भाग म्हणून शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून महाविद्यालयाच्या विस्तीर्ण परिसरात प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठीच "एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" हा नवोपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी सांगितले. या योजनेची सुरुवात म्हणून प्रा.धनंजय वाघमोडे, प्रा.कृष्णा रानगर, डॉ.शंकर गावडे, प्रा.सचिन लोखंडे, डॉ. यादवराव मोरे व प्राध्यापिका सौ.शिल्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवन व आंबा बागेत आंब्यांची झाडे लावून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी या योजनेचे समन्वयक डॉ.प्रकाश सज्जन यांनी सर्वांचे स्वागत करून "एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" या नवोपक्रमाची माहिती दिली. तर या योजनेचे दुसरे समन्वयक डॉ.पुंडलिक चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन