जतचे भूमिपुत्र डाॅ.अमोल यमगर यांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षांव

जतवार्ता न्यूज नेटवर्क; जत येथील डाॅ. अमोल यमगर यांना नुकताच गुवाहाटी येथे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत अप्रेसिएशन अवाॅर्ड हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. डाॅ. यमगर हे मूळचे जत येथील आहेत ते सद्या अंधेरी (पश्चिम) मुंबई येथे वास्तव्यास आहेत. मुंबई येथे डाॅ.अमोलसॄ स्माॅल ॲनिमल हेल्थकेअर या नावाने स्वताचे क्लिनिक चालवितात. गेल्या दहा वर्षापासून ते या क्षेत्रात पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, ससा, कासव व वन्य प्राण्यांवर उपचार व यशस्वी शस्त्रक्रिया करतात. डाॅ.अमोल यांच्या मार्गदर्शनाखाली सात सहकारी काम करतात. त्यांच्या क्लिनिकमध्ये एक्सरे, सोनोग्रापी, हाडांच्या शस्त्रक्रिया, दातांच्या शस्त्रक्रिया आणी सर्व लहानमोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. डाॅ.अमोल यमगर यांचे शालेय शिक्षण हे दि फ्रेंड्स असोसिएशन जत संस्थेच्या बालविद्यामंदिर व जत हायस्कूल जत येथे झाले आहे. तर येथील श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्यू.काॅलेज जत या ठिकाणी त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण झाले आहे. वैद्यकीय शिक्षण हे मुंबई पश...