आरळी हॉस्पिटलमध्ये केरळा थेरपी सेंटर सुरु होणार; मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन


जतवार्ता न्यूज नेटवर्क : 
    जत येथील अविरतपणे रुग्णांच्या सेवेत असलेल्या शांताबाई शिवशंकर आरळी हॉस्पिटलमध्ये दि. ९ जानेवारी पासून केरळा थेरपी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरचे उद्घाटन आ. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दि. ८ व दि. ९ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. रविंद्र आरळी, डॉ. रेणुका आरळी यांनी दिली. 
    नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या केरळा थेरपी सेंटरमध्ये सर्व रोगांवर केरळा थेरपी आयुर्वेदिक उपचार व सल्ला देण्यात येणार आहे. रक्तमोक्षण, मसाज थेरपी, कटी बस्ती, अग्नी कर्म, नस्य, नेत्र तर्पण, पिंड स्वेदन, शिरोधारा, तक्रधारा, कोलोन हायड्रोथेरीपी, स्पेशल हिमालया साल्ट रॉयल सोनाबाथ करण्यात येणार आहे. दोन दिवसीय शिबिरात पुणे व मिरज येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आरोग्य शिबिर संदर्भात काही अडचणी असल्यास सल्लागार रोहित सांगोलकर, रोहन सांगोलकर यांच्याशी  संपर्क साधावा असे आवाहन डॉ. आरळी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन