जत येथे सिद्धार्थ पब्लिक स्कूल मध्ये "सिध्दार्थ क्रीडा महोत्सव" उत्साहात साजरा
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.वैशाली सनमडीकर व संस्थेचे सचिव डॉ.कैलास उमाजीराव सनमडीकर व उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जतचे अध्यक्ष भारत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत येथे प्रशालेच्या प्रांगणामध्ये क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्थेचे अध्यक्षा डॉ. वैशालीताई सनमडीकर व संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, धावणे, रीले धावणे, तसेच क्रिकेट यासारख्या सांघिक खेळाचा तसेच वैयक्तिक वेगवेगळ्या खेळांचा समावेश होता. महोत्सवाची सुरुवात रेड, ब्ल्यू, येलो व ग्रीन या चारही हाऊसने परेड करून पाहुण्यांना मानवंदना दिली व क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून महोत्सवाची सुरुवात झाली. यामध्ये मुलींचा रस्सीखेच हा सामना अतिशय चुरशीने पार पडला. तसेच रिले धावणे हा सुद्धा खेळ अतिशय चुरशीने पार पडला. मुलींचा क्रिकेट सामना अतिशय रंजक पद्धतीने पार पडला. महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवांमध्ये पालकांचा सुद्धा समावेश होता. पालकांचा धावणे व संगीत खुर्ची हे दोन खेळ अतिशय चुरशीने पार पडले. शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुद्धा धावणे व क्रिकेट सामना आनंदामध्ये पार पडला.
सिद्धार्थ पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक सिद्धार्थ ब्ल्यू जर्सी युनिफॉर्ममुळे मैदानामध्ये एकीचे दर्शन घडवत होते. विद्यार्थ्यांच्या समोर एकीचे बळ काय असते हे सुद्धा दिसून येत होते. त्यामुळे या महोत्सवामध्ये पालकांचा सहभाग व शिक्षकांच्या सिद्धार्थ ब्लू जर्सी हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वैशालीताई सनमडीकर यांनी मार्गदर्शन करत असताना खेळामध्ये मुलींचा सहभाग चाचणी खूप गरजेचे आहे. असे सांगून मुलींना खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांनी जीवनामध्ये खेळ का आवश्यक आहे, खेळाचे महत्व पटवून दिले. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांना खेळामध्ये हार जीत ही पचवता आली पाहिजे. ज्या पद्धतीने आपण विजयी झाल्यानंतर आनंद व्यक्त करतो त्याच पद्धतीने मोठ्या मनाने आपण हार सुद्धा पचवता आली पाहिजे. या मैदानी खेळातून आपल्याला मानसिक दृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी मदत होते. मुलांनी शालेय जीवनामध्ये कमीत कमी दररोजच्या जीवनामध्ये 25 ते 30 मिनिटे आपला वेळ हा मैदानामध्ये घालवला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीने तंदुरुस्ती होते. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते असे त्यांनी सांगितले.
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच सर्व पालकांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले व इथून पुढचे कार्यक्रम याच उत्साहामध्ये पार पाडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी पद्धतीने पार पडावा म्हणून प्रशालेचे प्राचार्य के श्याम सुंदर व क्रीडा विभागाचे प्रमुख शाहू कांबळे व सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
Comments
Post a Comment