जतमध्ये शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक कार्यक्रम; संगीता चोपडे यांचे कीर्तन

जतवार्ता न्यूज नेटवर्क; जत शहरात शिवजयंतीनिमित्त १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने देण्यात आली. जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी शिवजयंती सोहळा जल्लोषात साजरा होतो. सोमवार, दि. १७ व मंगळवार, दि. १८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नं. २ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मानवंदना देण्यात येणार आहे. मंगळवार, दि. १८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता युवा कीर्तनकार संगीता येनपुरे-चोपडे यांचे कीर्तन होणार आहे. रात्री ९ वाजता भव्य आतषबाजी सोहळा होणार आहे. बुधवार, दि. १९ रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले रामगड येथून शिवज्योत आणण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखी मिरवणूक व पालखी होणार आहे. दुपारी ११.३० ते ४ या वेळेत तुळजाभवानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आह...