अचकनहळ्ळीचे सामाजीक कार्यकर्ते समाधान शिंदे यांनी सुरू केलेल्या "हाॅटेल घरचा स्वाद" या हाॅटेलचे मोठ्या थाटात उद्घाटन


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    अचकनहळ्ळी ता. जत येथील माजी उपसरपंच व सामाजीक कार्यकर्ते श्री.समाधान शिंदे यांनी मोरे  काॅम्प्लेक्स व शाॅपींग सेंटर या ठिकाणी हाॅटेल घरचा स्वाद हे हाॅटेल सुरू केले असून या हाॅटेल चे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
    हाॅटेल घरचा स्वाद हे हाॅटेल व नाष्टा सेंटर हे नविन प्रशासकिय इमारतीच्या पाठीमागील बाजूस असून या परिसरात विविध शासकिय कार्यालये आहेत. हाॅटेल घरचा स्वाद व नाष्टा सेंटरच्या माध्यमातून आपण ग्राहकांसाठी उत्कृष्ट नाष्टा व जेवणासाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम अशी सोय केली आहे.
    तसेत कोल्ड्रिंक व सर्व प्रकारचे ज्यूसही या ठिकाणी मिळणार आहेत. या हाॅटेलचे वैशिष्ट्य म्हणजे चुलीवरील मटण ग्राहकांना मिळणार असून ग्राहकांनी एकवेळ आमच्या हाॅटेल घरचा स्वाद या हाॅटेलला भेट देऊन जेवणाचा स्वाद घ्यावा असे आवाहन श्री.समाधान शिंदे यांनी केले आहे.
    या उद्घाटन प्रसंगी, अशिर्वाद क्लासेस जतचे श्री.मधुकर शिंदेसर, सेवानिवृत्त मेजर आकाराम बिसले, नेताजी शिंदे, सिद्राया पाटील, गौरीहर पतंगे, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे, अशोक तेली, श्रीकृष्ण पाटील, बाळासाहेब बुध्दसागर, अनिल कुलकर्णी, पिंटू स्वामी, दशरथ कोळी, बापू ऐवळे, शौकत शेख, सचिन शिंदे, रावसाहेब शिंदे, नितीन शिंदे, भागवत काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन