गुरुकुल विद्यामंदिर कुणिकोणुर शाळेचा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात
आई-वडिलांची सेवा व प्रामाणिकपणा जपा जीवनात यशस्वी व्हाल :अनिल जाहीर
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील गुरुकुल विद्यामंदिर कुणिकोणुर या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून आणि विविध संस्कृतिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर सचिन लिगाडे मेडिकल ऑफिसर आनंद हॉस्पिटल, डायरेक्टर दक्षता हॉस्पिटल सांगोला हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संदीप कांबळे उमदी पोलीस स्टेशन उमदी, अनिल जाहीर संस्थापक अध्यक्ष, तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे होते.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर सुखदेव शिंदे, केंद्रप्रमुख, संतोषजी खिलारे संस्था कायदेशीर सल्लागार, संजय कांबळे पत्रकार, भारत क्षिरसागर ,अनसर बुराण शेख ज्येष्ठ माजी सैनिक, नारायण गोविंद नरळे आधारस्तंभ, नवनाथ आटपाडकर मार्गदर्शक, संजयकुमार माळी हवलदार उमदी पोलीस स्टेशन, डॉक्टर ज्ञानराजे नरळे (सरकार) मातोश्री हॉस्पिटल येळवी,विकासजी साबळे आरपीआय सांगली जिल्हा उपाध्यक्ष, महादेव नरळे उपाध्यक्ष, विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक नवनाथ जिपटे, विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी तनाया वसंत सावंत, सुनील साळे सर मुख्याध्यापक, डी. आर. चव्हाण सचिव हुडेबाबा हायस्कूल, पुकार आवटे सामजिक कार्यकर्ते, धसाडे साहेब उमदी पोलीस स्टेशन, सोमा आबा मोटे प्रदेश उपाध्यक्ष रा. स. प., तानाजी पाटील सर, लक्ष्मण पाटील सर, समाधान पडोळकर सरपंच, चंद्रकांत कोळी शिक्षक बँक अधिकारी, आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अनिल जाहीर म्हणाले की, आपला पाल्य जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.
पण आपणही आपल्या मुलांवराती चांगले सुसंस्कार करावेत. आई-वडिलांची सेवा करावी. प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चित आपला पाल्य यशस्वी होईल. जिवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वास वाढवावा लागतो. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. व विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावे.
यावेळी संदीप कांबळे एपीआय उमदी यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आतापासून तयारी करावी. असा सल्ला दिला. व कोणतेही काम मनापासून केल्यास निश्चित यश मिळते. असे सांगितले.
केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे, डॉक्टर सचिन लिगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांचे व एन. एम. एम. एस. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
पहिल्याच वर्षी शाळेमध्ये २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही गोष्ट अतिशय चांगली आहे. विद्यार्थी विविध परीक्षेमध्ये चांगले यश संपादन करत असल्याबद्दल नरळे सर व त्यांच्या सर्व स्टाफचे मान्यवरांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी अनेक गाणी, नाटिका बम बम बोले, झुंजूमुंजू वासुदेव गीत, लुंगी डान्स,माऊली माऊली, पाटलांचा बैलगाडा, बंजारा गीत, शिवाजी महाराज थीम, अशी एकापेक्षा एक तेवीस वरचढ प्रेक्षकांपुढे जबरदस्त गाणी सादर केली.व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठा प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांचा कलागुणांचा कार्यक्रम प्रभावी सादर झाला. या साठी कोरिओग्राफी राहूल चौरे (सोनू) यांचे मोठे योगदान लाभले.]या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, शाळेतील सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मारुती नरळे,सूत्रसंचालन अस्लम शेख,दत्तात्रय चौगुल यांनी केले तर आभार भारत क्षिरसागर यांनी मानले.

Comments
Post a Comment