संत रोहिदास महाराज जयंती सर्व शासकीय कार्यालयांत साजरी करा; अरुण साळे
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
संत रोहिदास महाराज यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी व्हावी, जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवावेत, अशी मागणी गुरु रविदास समता परिषदेचे जत तालुका अध्यक्ष अरुण साळे यांनी केली. जिल्हाधिकारी यांना त्याबाबत निवेदन दिले.
समतेचा संदेश देणारे संत रोहिदास महाराज यांची ६४८ वी जयंती दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी होत आहे. शासकीय परिपत्रकानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये संत रोहिदास यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचे आदेश आहेत. मात्र बहुसंख्य शासकीय कार्यालयांमध्ये अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. जयंती साजरी करण्याबाबत सर्व शासकीय कार्यालयांना स्पष्ट आदेश द्यावेत. त्याचा अहवाल घ्यावा. कार्यक्रमास चर्मकार समाजातील स्थानिक कार्यकत्यांना निमंत्रित करावे, अशी मागणीही साळे यांनी केली आहे.

Comments
Post a Comment