राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न

जत वार्ता न्यूज नेटवर्क/प्रतिनिधी: येथील राजे रामराव महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्य राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक मा.अभय जायभाये हे प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.अभय जायभाये बोलताना म्हणाले की, कोरोना महामारी मधे स्वयंसेवकानी आपली जबाबदारी ओळखावी व त्याप्रमाणे समाजात जनजागृती करावी असे सांगत तरुनांची या देशांत कमी नाही, परंतु या सर्व तरुनांनी आपले काम आपले श्रम करत राहिले तर नक्कीच तो तरुण काळा बरोबर टिकून राहील असे सांगितले.

या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वय मा ज्ञानराजा चिघळीकर हे सुध्दा उपस्थित होते. यावेळी बोलताना म्हणाले की, स्वयंसेवकांना श्रम केलेल्या लोकांचीच समाजात किंमत असते त्यासाठी स्वतः आपण श्रम करणे आवश्यक आहे असे सांगितले .ज्याप्रमाणे एखाद्या बी जमिनीत स्वताःहाला गाडुन घेते व इतरांना फळे फुले देते त्याप्रमाणे या देशातील  तरुण यांनी स्वतः समोर येऊन कष्ट करणे काळाची गरज आहे असे सांगितले. त्याबरोबरच आत्तापर्यंत झालेल्या सर्व चळवळीत तरुण वर्ग समोर होता हे विसरून चालत नाही याचीही आठवण करुण दिली. 

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.एस.ढेकळे बोलताना म्हणाले की,शिक्षकांनी आपली भूमिका योग्य पध्दतीने पार पाडली तर नक्कीच ऊद्याचा नागरिक आदर्श नागरिक म्हणून नावारुपाला येईल. या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ शिवाजी कुलाल, प्रा.रानोबा कारंडे,डॉ.संजय लठ्ठे, प्रा.शिंदे ,प्रा हिरामण टोगरे, प्रा अशोक बोगुलवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन