जत येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोवीड सेंटर सुरू; आ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
जत येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोवीड सेंटर सुरू; आ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील कोरणा बाधित रुग्णांना सांगली व मिरज येथे उपचारासाठी जावे लागू नये म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून समाजकल्याण वस्तीग्रह जत येथे नव्याने कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा तालुक्यातील नागरिकांना होणार आहे. अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी दिली. कोवाड सेंटरचे उद्घाटन आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर, मुख्याधिकारी मनोज देसाई, इंडियन मेडिकल असोसिएशन जत अध्यक्ष डॉ. रोहन मोदी, उपाध्यक्ष डॉ. शरद पवार, डॉ.काळगी, डॉ.गुरव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजकल्याण वस्तीगृह इमारतीत 50 ऑक्सिजनचे बेड व इतर 27 बेड 8 व्हेंटिलेटर तज्ञ डॉक्टर व कर्मचारी यांची नेमणूक करून शासनाच्या परवानगीने कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाकडून शासकीय दरापेक्षा 25% कमी बिल आकारणी करून बिल घेतले जाणार आहे. गंभीर आजारी रुग्णांना सांगली किंवा मिरज येथे जावे लागत होते. या सेंटरमुळे आता त्याची ची गरज भासणार नाही. येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी असून 24 तास रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. माफक दरात बिल आकारणी होणार असल्यामुळे खर्चाची बाजू कमी होणार आहे. तालुक्यातील कोरणा बाधित रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही आमदार सावंत यांनी यावेळी केले. कोरोना सेंटरसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कोअर कमिटीच्या माध्यमातून सर्व कोवीड सेंटर मधील यंत्रणा राबवण्यात येणार आहे. त्यावर शासनाचे नियंत्रण राहणार आहे. सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना जेवण, अल्पोपहार व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. असेही विक्रम सावंत यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment