शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यरत- अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर
सांगली: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे कोविड-19 म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे. या रूग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यरत आहे. या योजनेत दाखल झालेल्या रूग्णांच्या या रूग्णालयातील सर्व तपासण्या मोफत केल्या जातील. तसेच ज्या तपासण्या रूग्णालयात उपलब्ध नाहीत त्या देखील खाजगी प्रयोगशाळेतून या योजनेंतर्गत मोफत केल्या जातील. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली.
योजनेचा लाभ घेण्यासाठी रूग्णाचे आधार कार्ड (आधार कार्ड उपलब्ध नसल्यास फोटो असलेले शासकीय ओळखपत्र उदा. पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसेन्स, मतदान ओळखपत्र इ.), रूग्णाचे नाव नमूद असलेली शिधापत्रिका (रेशनकार्ड) ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या दोन्ही ओळखपत्राची मुळ प्रत किंवा मुळ प्रतीचा कलर फोटो आरोग्यमित्रास दाखवणे आवश्यक असते. तसेच या रूग्णालयात खाट उपलब्धतेबाबत व दाखल रूग्णांची माहिती हवी असल्यास सेंट्रल कमांड सिस्टीम दुरध्वनी क्रमांक 0233-2332099 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा २४ तास (२४x७) दररोज उपलब्ध असल्याचे श्री. नणंदकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
Comments
Post a Comment