जत काँग्रेस वतीने केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शने

जत/प्रतिनिधी: जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी व कामगार बचावो दिवस, शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी जत तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस येथील घटनेच्या पिडीतांना भेटायला जाणारे काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्का बुक्की व मारहान झाल्याबद्दल जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जत तहसीलदार कार्यालय येथे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया काका बिराजदार, माजी पं. स. सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, पं. स. सदस्य रविंद्र सावंत, पं. स.दिघवीजय चव्हाण, मार्केट कमिटी संचालक अभिजित दादा चव्हाण, सांगली जिल्हा काॅग्रेस ओबीसी अध्यक्ष तुकाराम माळी सर, माजी नगरसेवक महादेव कोळी, नगरसेवक नामदेव काळे, विक्रम फाऊंडेशन अध्यक्ष युवराज बाळ निकम, माजी ग्रा.प.सदस्य सलीम भाई पच्छापूरे, माजी नगरसेवक निलेश बामणे, माजी नगरसेवक मुन्ना पखाली, सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस रमेश कोळेकर, जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने, NSUI तालुका अध्यक्ष बाळू बामणे, उपाध्यक्ष गणी मुल्ला, जत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे, फिरोज नदाफ, बाळासाहेब तंगडी, अप्पू माळी, प्रदीप नागणे, युवक काँग्रेस सरचिटणीस पपु कोडग, मिथुन माने, अमर माने, अतुल मोरे व सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन