जत नगरपरिषदेच्या वतीने कोरोना काळात अहोरात्र झटणाऱ्या आशा सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय

जत/प्रतिनिधी: शहरात कोरोना संसर्ग वाढला असताना ही अशा परिस्थितीत आशा सेविका आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र आपले काम करत आहेत. त्यांना मागणीनुसार प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय जत नगरपरिषदेने घेतला आहे. त्यामुळे आज (सोमवारी) होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले. ही माहिती कॉ. हणमंत कोळी यांनी दिली.

सोमवार दि. 5 ऑक्टोबर रोजी जत नगरपरिषद समोर आशा सेविका यांच्या प्रोत्साहन भत्त्या संदर्भात धरणे आंदोलनाला बसण्यात येणार होते. पण नगरपरिषदेने संघटनेच्या पदाधिकारी यांना बैठकी साठी बोलावले होते. या बैठकीच्या चर्चेतून जत शहरातील 33 आशा सेविका यांना कोरोनाच्या काळामध्ये अहोरात्र काम करत असल्याबद्दल नगरपरिषद कडून आशा वर्कर्स यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे मंजूर केले आहे. व जोपर्यंत कोरोना आहे. तोपर्यंत आशांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे ठरले आहे. या बैठकीसाठी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज देसाई, उपनगराध्यक्ष आप्पासो पवार, नगरसेवक स्वप्नील शिंदे, निलेश बामणे, आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी, आशा वर्कर्स ललिता सांवत, लता मदने, रेश्मा शेख व इतर आशा वर्कर्स उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष