संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीमुळे सार्वजिक बांधाकाम विभागाची दिलीप बिल्डकॉन कंपनीला नोटीस
जत/प्रतिनिधी: दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अवजड वाहतूक करणार्या वाहनांमुळे बेवनूर ते जुनोनी हा रस्ता पूर्णपणे खचुन मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना जाण्यासाठी व वाहने चालवताना अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत वाहनांचे नुकसान होतच आहे. परंतु माणसांच्या जीवितास सुध्दा धोका निर्माण झालेला आहे. बेवनूरचे मोटारसायकलस्वार दादासो शंकर सरगर व वसंत धोंडिराम माने हे बेवनूर-जुनोनी रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे अपघात झालेला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तरी या बेकायदेशीर गतीरोधकांमुळे व दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या वाहनानमुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे हे अपघात झालेले असून, त्यास गतीरोधक घालणारे, परवानगी देणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी व प्रशासन तसेच दिलीप बिल्डकॉन कंपनी जबाबदार असून या अपघातग्रस्त दोन्ही व्यक्तींची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यांच्या उपचारासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी प्रशासन कंपनी यांच्याकडून नुकसानभरपाई मिळावी. रस्त्यावर असलेले बेकायदेशीर गतीरोधक तात्काळ काढण्यात यावेत व भविष्यात होणारे अपघात टाळावेत अशा प्रकारचे निवेदन संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश शंकर नाईक यांनी दि 29/ 9 /2020 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अशोक मुंनगिकर साहेब यांना तक्रार केली होती. त्या अनुषंगाने दिलीप बिल्डकॉन कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभाग सांगोला यांनी कंपनीला नोटीस काढलेली आहे. त्यात म्हंटले आहे की रस्त्यावरिल अपघाती गतिरोधक काढावेत, त्वरित खड्डे व रस्ता दुरूस्त करावा व अपघाती व्यक्तींची नुकसान भरपाई दिलीप बिल्डकॉन कंपनीने द्यावी तसेच भविष्यात रस्ता खराब होऊन अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ही दिलीप बिल्डकॉन कंपनीची राहिल अशी नोटीस काढली आहे. तरी संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीची व सार्वजनिक बांधाकाम विभागाच्या नोटीसची दखल घेत दिलीप बिल्डकॉन कंपनीने तात्काळ अपघाती गतीरोधक काढलेले आहेत व जुनोनी हद्दीतील खड्डे बुजवलेले आहेत. परंतु अपघाती व्यक्तींची नुकसाई भरपाई दिलेली नसुन ती लवकरात लवकर द्यावी. तसेच जत येथील संबधित विभागांना दिलेल्या निवेदनाची दखल घेत बेवनूर हद्दीतील गतीरोधक तात्काळ काढून, रस्ता दुरूस्त करावा व अपघातग्रस्तांची नुकसान भरपाई मिळावी अन्यथा लवकरच संभाजी ब्रिगेड सांगलीजिल्ह्यांच्या व बेवनूर व जुनोनी ग्रामस्थाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व आंदोलनामुळे होणार्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहिल याची दखल घ्यावी.
Comments
Post a Comment