बेवनूर ते जुनोनी रस्त्याची दुरवस्था । गतिरोधकामुळे अपघात झालेल्याना नुकसानभरपाईची मागणी; संभाजी ब्रिगेड
जत/प्रतिनिधी: डी. बी. एल. कंपनीच्या वाहनांमुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती व अपघाती गतिरोधक काढणेबाबत तसेच गतिरोधकामुळे अपघात झालेल्या व्यक्तीस नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी मा. तहसिलदारसो सचिन पाटील व मा. पंचायत समिती गटविकास अधिकारीसो अरविंद धरणगुत्तीकर जत यांच्याकडे केली आहे.
बेवनूर ते जुनोनी हा रस्ता डी. बी. एल. कंपनीच्या अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे पुर्णपणे खचून मोठमोठे खडे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी व वाहने चालवताना अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत वाहनांचे तर नुकसान होतच आहे. परंतु नागरिकांच्या जीवितास सुध्दा धोका निर्माण झालेला आहे. बेवनूरचे मोटारसायकल स्वार दादासो शंकर सरगर हे दि. २४/०९/२०२० रोजी बेवनूर - जुनोनी रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे अपघात झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले आहे. तसेच वसंत धोंडीराम माने हे दि. ३०/०९/२०२० रोजी बेवनूर - जुनोनी रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे अपघात झालेला असून तेही गंभीर जखमी झालेले असून त्यांना रुग्नालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे. त्यांना टाके पडलेले आहेत. तरी या बेकायदेशीर गतिरोधकामुळे व डी. बी. एल. कंपनीच्या वाहनांमुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे हा अपघात झालेला असून त्यास विना परवाना गतिरोधक घालणारे, गतिरोधकास परवानगी देणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी व प्रशासन तसेच डी. बी. एल. कंपनी जबाबदार असून तसेच त्या दोन्ही व्यक्तींची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्याकडे उपचारासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी व प्रशासन तसेच डी. बी. एल. कंपनी यांचेकडून नुकसान भरपाई मिळावी. व रस्त्यावर असलेले बेकायदेशीर गतिरोधक तात्काळ काढण्यात यावेत. तसेच भविष्यात होणारे अपघात टाळावेत हि विनंती. अन्यथा संभाजी ब्रिगेड व बेवनूर - जुनोनी ग्रामस्त यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन म्हंटले आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक, जिल्हाउपाध्यक्ष डॉ.सुधिर नाईक, जिल्हाअध्यक्ष राजेंद्र पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, संदिप नाईक यांच्या स्वाक्षरी आहेत.
Comments
Post a Comment