सोनलगी ता.जत येथे बोर नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू

जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील सोनलगी येथे बोर नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. महांनतेश विठ्ठल कांबळे (वय १४) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळाले माहिती अशी की, बोर नदी ओढापात्रात सध्या तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी वाहत आहे. आज सकाळी महांनतेश कांबळे हा आपल्या दोन मित्रांबरोबर बोर नदी पात्रात पोहायला गेला होता. मात्र, पात्रात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर घटनास्थळी हजर झाले होते. महांनतेशचा मृतदेह शोधण्यासाठी सांगलीहून पाणबुडी पथकाला पाचारण करण्यात आले होते.


तसेच उमदी पोलीस, ग्रामस्थ मृतदेहाचा शोध घेत होते. परंतु, बोर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मृतदेहाचा शोध घेण्यास अडचणी येत होती. 
शेवटी सांगली येथील आयुष हेल्पलाईन टीम, उमदी पोलीस व ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नातून सायंकाळी उशिरा मृतदेह सापडला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन