उमराणी येथे १४७ किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील उमराणी येथे गांज्याच्या शेतीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांने छापा टाकत १७ लाख ७६ हजार किंमतीचा १४७ किलो वजनाचा ओला गांजा जप्त केला आहे. मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मल्लाप्पा ईरगोडा बिराजदार यांच्या विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा.पोलीस अधीक्षकसो दिक्षीत गेंडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुवुले मॅडम, यांनी सांगली जिल्हयात गांजाची लागवड करणा-या व गांजा विक्री करणारे इसमाची माहिती काढुन त्याचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी गांजाची लागवड करणा-या व गांजा विक्री करणाऱ्या इसमाची माहिती काढुन त्याचेवर कारवाई करणेसाठी खास पथक तयार केले.
दिनांक ०६.१०.२०२० रोजी जत विभागमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, साफी अच्युत सुर्यवंशी, राजेद्र मुळे, जितेद्र जाधव, आमसिध्दा खोत, राजु शिरोळकर, महादेव धुमाळ, सचिन कुंभार, मुदतसर पाथरवट, राहुल जाधव, प्रशांत माळी, असे शासकीय वाहनाने पेट्रोलिग करीत गांजाची लागवड करणा-या व गांजा विक्री करणारे इसमाची माहिती घेत असताना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, उमराणी गावी मल्लाप्पा ईरगोडा बिराजदार याचे ऊसाचे शेंतात गांजाची लागवड केली असल्या बाबत माहिती मिळाली, मिळाले माहिती प्रमाणे पोलीस अधिकारी, पोलीस स्टाफ व पंचाने उमराणी गावी मल्लाप्पा ईरगोडा बिराजदार याचे ऊसाचे शेंतात छापा मारुन शेतमालक यास ताबेत घेऊन पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, यानी त्याचे नाव, गाव विचारता त्याने आपले नाव मल्लाप्पा ईरगोडा बिराजदार वय-६५ रा. उमराणी ता. जत जि. सांगली असे असल्याचे सांगितले त्यावेळी मल्लाप्पा बिराजदार याचे ऊसाचे शेतात पंचासमक्ष पाहणी केली असता. त्याचे ऊसाचे शेतात १४७ किलो वजनाचा किमत रुपये १७ लाख ७६ हजार रुपयाचा ओला गांजाची झाडे मिळाली ते सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पालीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सा.पो.फौ. अच्युत सुर्यवंशी, राजेंद्र मुळे, जितेद्र जाधव, आमसिध्दा खोत, राजु शिरोळकर, महादेव धुमाळ, सचिन कुंभार, मुदतसर पाथरवट, राहुल जाधव, प्रशांत माळी अरुण सोकटे यांनी पार पाडली.
Comments
Post a Comment