ग्रामपंचायत सदस्या सरसाबाई सोनुरे यांच्या माध्यमातून शासकीय मेळाव्याचे आयोजन

 


जत वार्ता न्यूज नेटवर्क:-  

      जत तालुक्यातील अचकहळ्ळी येथील ग्रामपंचायत सदस्या सौ सरसाबाई सोनुरे व युवा नेते रोहीत सोनुरे यांच्या माध्यमातून निरनिराळे शाशकीय मेळावा आयोजित करण्यात आला असून.
      या मध्ये गावात "आयुष्यमान भारत कार्ड,गोल्डन कार्ड,मोबाईल नंबर लिक" असा अनेक योजना राबविण्यात येणार आहे.याचा फायदा या गावातील नागरिकांना होणार असून. याचे उद्घाटन सोमवार दि 20 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरवात होणार आहे. हे अभियान गावामध्ये दोन दिवस चालणार आहे. तरी गावामधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या सौ.सारसाबई गुलाब सोनुरे यांनी केले आहे.
      ग्रामपंचायत सदस्या सौ.सारसाबई गुलाब सोनुरे बोलताना म्हणाल्या की, केंद्र सरकारने सुरु केलेल्या  योजना ही गरजू व गोरगरीब जनतेच्या हिताची आहे. त्याचा लाभ सामान्य जनतेला मिळावा या निस्वार्थ हेतूने गावातील नागरिकांना मिळण्यासाठी काम करीत आहेत.
      हे अभियान ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार व मंगळवार या दिवशी आहे.सर्वसामान्य नागरिकांना आजही केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती नाही.ही माहिती सर्वसामान्य घटका पर्यंत पोहचवावी.या चा फायदा सर्वसामान्य नागरीकांना व्हावे हा हेतू असल्याचे ग्रामपंचायत सदस्या सरसाबाई सोनुरे म्हणाल्या.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण