जतेतील राजे रामराव महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बारावी परीक्षा व विद्यापीठ परीक्षेवर बहिष्कार..!
जत वार्ता न्यूज:-
बारावीच्या बोर्ड परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत तसेच विद्यापीठ परीक्षेवर जतेतील राजे रामराव महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे कर्मचारीच नसल्याने कॉलेज बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या सर्व मागण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे.
या बेमुदत संपास कार्यालयीन अधीक्षक मनोहर मोरे,शिवराम मोईन,संजय राजमाने,बिराप्पा पुजारी,रामा शिंदे,राजू माळी,रियाज गंजीवाले,गजानन कुंभार,निलेश माने,अमोल डफळे, उमेश सावंत,धनाजी हिप्परकर,तुकाराम शिंगाडे,आबा शिरगिरे,राजू ईमडे, अधिक घुंगरे,गोरख हेगडे,बापू सावंत, गजानन कुंभार,श्रीशल बिराजदार, झाकीरहुसेन मुलाणी,अक्षय वाघमोडे व बिरुदेव सदाकळे आदी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment