सरकार तुपाशी अंगणवाडी सेविका मात्र उपाशी



जत वार्ता न्यूज:- अंगणवाडी सेविका व मदतीनस यांचा मानसन्मान राखला गेला पाहिजे तसेच त्यांच्या वेतनातही वाढ झाली पाहिजे. अंगणवाडी सेविका म्हणजे खळाळता ऊर्जा स्त्रोत. आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या अडचणींचा सामना करत हसत मुखाने बालकांच्या सेवेसाठी आणि त्यांना सुपोषण मिळावे यासाठी सतत झटणाऱ्या या माझ्या भगिनी म्हणजे रणरागिनीच. असे उद्गार राष्ट्रवादीचे सागर शिनगारे यांनी अंगणवाडी सेविका यांनी जत पंचायत समिती येथे केलेल्या एक दिवशीय आंदोलनावेळी केले.
       यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, अंगणवाडी सेविकांचा विषय खूप गंभीर आहे. दुर्देवाने सरकार गंभीर नाही... कुपोषणाने हजारो बालकांचे दरवर्षी मृत्यू होतात... तिथे कोणते गाजर दाखवणार हे सरकार देव जाणे!!!
      एकदा आंदोलन करून देखील ईडी सरकारचे डोळे उघडले नाहीत,अंगणवाडी सेविकाचे मानधन, अंगणवाड्यांचे भाडे,आहाराच्या दरात न झालेली वाढ,सेवा समाप्ती लाभ,आजारपणाच्या रजा, हक्काची उन्हाळी सुट्ट्या,नवीन मोबाईल यासाठी अंगणवाडी सेविका पुन्हा कामबंद आंदोलन सुरु झाले आहे.
     महाराष्ट्र राज्याचा विकास करण्यासाठी गद्दारी करून स्थापन झालेले खोके सरकार मात्र अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. या उलट महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब अर्थमंत्री, माननीय अजित दादा व महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भरीव तरतूद करून १०० कोटी रुपये चा निधी दिला होता. यानंतर अंगणवाडी सेविकांसाठी प्रस्ताव तयार करून दाखल केला होता, तोपर्यंत हे सरकार कोसळले व आताच्या सरकारने हिवाळी अधिवेशनात आश्वासन देऊनही कोणतीही ठोस पाऊल उचलले नाही.
       आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सागर तानाजी शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती च्या नादीरा नदाफ, उमदी प्रमुख कस्तुरी पट्टणशेट्टी, शेगाव प्रमुख विमल सावंत, संख प्रमुख मथुरा कांबळे, मुचंडी प्रमुख शोभा पोतदार, बिळुर प्रमुख शैला पाटील व इतर अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड