जत बाजार समितीच्या पोटभाडेकरूंवर कारवाईसाठी लाक्षणिक उपोषण; गौतम ऐवाळे

 


जत वार्ता न्यूज:- 
       शहरातून जाणाऱ्या विजयपूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गालगत जत बाजार समितीच्या मालकीचे गाळे आहेत. शेतकरी, व्यापाऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी अल्पदरात छोट्या व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना व्यवसायासाठी ते उपलब्ध करून दिले जातात. सध्याची परिस्थिती पाहता याचा उद्देश चुकीचा ठरला आहे. एकूण दुकान गाळ्यापैकी ९० टक्के गाळ्यांत पोटभाडेकरू ठेवण्यात आले आहेत. हे बाजार समितीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. याबाबत पोटभाडेकरूवर कारवाई करण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण जत बाजार समितीसमोर करणार असल्याचे निवेदन भाजपचे माजी नगरसेवक गौतम ऐवाळे यांनी दिले आहे.
      सदरचे निवेदन दुय्यम बाजार समिती जतचे सहाय्यक सचिव, सांगली बाजार समितीचे सचिव तथा प्रशासक, पणन विभाग मंत्रालय मुंबईचे सचिव यांना दिले आहे. 
      निवेदनात पुढे म्हटले आहे की, सर्व गाळ्यांमध्ये असणाऱ्या पोटभाडेकरू यांना लवकरात लवकर काढून टाकण्यात यावे. तसेच नियमांचा भंग करणाऱ्या मूळ भाडेकरू यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांच्याकडील गाळे काढून घ्यावेत. सदरचे गाळे सुशिक्षित बेरोजगार गरीब, होतकरू, शेतकरी व व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी देण्यात यावेत. या मागणीसाठी शुक्रवार दि. २४ फेब्रुवारी रोजी जत येथील बाजार समितीच्या कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी, असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड