जागर फौंडेशन आयोजित 'आयुष्मान भारत कार्ड' अभियान | आमदार सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत येथील जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक परशुराम मोरे यांच्या वतीने "आयुष्मान भारत कार्ड" हे अभियान शहरात गेले अनेक दिवसापासून सुरू आहे. रविवार दि. ५ मार्च रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील नागरिकांसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परशुराम मोरे यांनी केले आहे. येथील बचत भवन या कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे उदघाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
परशुराम मोरे म्हणाले, केंद्र सरकारने सुरु केलेली ही योजना गरजू व गोर गरीब जनतेच्या हिताची आहे. त्याचा लाभ जत शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी जागर फाऊंडेशनचे सदस्य काम करीत आहेत. शहरातील गोरगरीब व सामान्य कुटुंबातील लोकांना सरकारच्या योजनेचा लाभ व्हावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. आमच्या कुंटुबाला समाजसेवेचा वारसा आहे. आमचे वडील शहरातील गोरगरीब व वंचीत घटकातील समस्या ह्या स्वतःच्या मानून त्या सोडवण्यासाठी काम करीत राहिले. त्यांचे स्वप्न उराशी बाळगून मी काम करीत आहे."आयुष्मान भारत कार्ड"अभियान शहरात सुरू केले आहे. यासाठी शहरातील आमच्या विचाराचे व जागर फाऊंडेशनचे सदस्य काम करीत आहेत. यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व माहिती व यंत्रणा आहे. याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आव्हान संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment