महिला दिनानिमित्त भगिनी निवेदिता वसतिगृहास धान्याचे वाटप


 जनसेवक डॉ. प्रविण वाघमोडे यांचा स्तुत्य उपक्रम 


जतवार्ता न्यूज नेटवर्क : जगातील महिला दिनाचे औचित्य साधून जत येथील पशुसेवक म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करणारे डॉ. प्रविण वाघमोडे यांनी जत येथील भगिनी निवेदिता निराधार मुलींच्या वसतिगृह येथे आवश्यक असणाऱ्या अन्न धान्याचे वाटप केले यावेळी बंटी नदाफ, प्रमोद ऐवळे, पत्रकार अमोल कुलकर्णी, पत्रकार गोपाल पाथरुट, महेश गुरव, राहुल मालाणी, प्रविण गडदे, आदेश जाधव, सागर कोळी, सचिन कुकडे, योगेश शिंदे, कुलदीप होर्तीकर, पत्रकार शशिकांत हेगडे, गुरू माळकोटगी, निवेदिता संचालिका मुळे मॅडम आदी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना बंटी नदाफ यांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिला दिनानिमित्त असे सामाजिक सहकार्य दर्शवणारे उपक्रम गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी नदाफ यांनी केले. 
     आमचे प्रतिनिधी सोबत बोलताना डॉ. वाघमोडे म्हणाले की, अनावश्यक खर्च करून कार्यक्रमाला फाटा देत, शासन आणि कार्यालयीन सोयी अभावी पण उत्तम प्रकारे अनाथ आणि निराधार कुटुंबातील मुलींचे संगोपन आणि शिक्षण देत त्यांना समाजात स्थान मिळवून देणाऱ्या संस्था असणाऱ्या भगिनी निवेदिता सारख्या संस्थांना अविरत मेहनतीने चालू आहेत त्यांना या अशा जगातील जयंती किंवा सोहळे प्रसंगी मदत करून उभारी देणे गरजेचे आहे. समाजातील घटक म्हणून त्यांना वेळोवेळी मदत कार्य देत त्यांचे संगोपन करणे आज आद्य कर्तव्य आहे. माझ्या मार्फ़त मी असे उपक्रम हाती घेत असून कायम समाजासाठी करण्यासाठी प्रेरित असेन अशी ग्वाही यावेळी डॉ. वाघमोडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड