चिखलगी भुयारमध्ये तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा; तुकाराम महाराज

आठ व नऊ मार्चला विविध कार्यक्रम

जतवार्ता न्यूज नेटवर्क:- चिखलगी भुयार मठ येथे आठ व नऊ मार्च रोजी  जगतगुरु तुकाराम महाराज बीज व वैकुंठ गमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तुकाराम बीज निमित्य प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दोन दिवस हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती व श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
        तुकाराम बाबा म्हणाले, श्री संत बागडेबाबा यांनी चिखलगी भुयार मठ येथे तुकाराम बीज वैकुंठगमन सोहळा आयोजित केला. तेव्हापासून आतापर्यत हा अखंड सोहळा सुरू आहे. दोन दिवसांचा हरिनाम सप्ताह, धार्मिक कार्यक्रम मठात पार पडतात. या सोहळ्याला जत, मंगळवेढासह राज्यभरात श्री संत बागडेबाबा यांचे असलेले भक्त आवर्जून उपस्थित असतात. तुकाराम बीज दिनी चिखलगी भुयार येथे भक्तांचा मेळाच जमतो. हजारो भक्तांची उपस्थिती असते.
       यंदा आठ मार्च रोजी तुकाराम बीज वैकुंठगमन सोहळ्यास सुरुवात होणार आहे. नऊ मार्च रोजी दुपारी बारा वाजता फुले व गुलाल कार्यक्रमाने सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता होणार आहे. या सोहळ्याला भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
रक्तदान शिबिराचे आयोजन - 
       तुकाराम बीज वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त चिखलगी भुयार मठात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या भाविकांना रक्तदान करायचे आहे त्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष