जत येथे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन

ह.भ.प. मोहन महाराज घोटीकर यांचे कीर्तन

जतवार्ता न्यूज नेटवर्क:
      श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जत येथे ह.भ.प. मोहन पाटील ( घोटीकर ) महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहीती ट्रस्ट चे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
       यावेळी बोलताना ते म्हणाले की,आम्ही दरवर्षी श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो. जत सांगली या मार्गावर असलेल्या आर.आर.काॅलेज पाठीमागील राजे छत्रपती शिवाजीमहाराज नगर या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर आहे. या मंदिरात महाराष्ट्रातील अनेक नवोदीत कीर्तनकार यांचा झी टि.व्ही.च्या माध्यमातून दोनवेळा किर्तन महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
      श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दर पोर्णीमेदिवशी पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा,त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, नंतर बारावाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवर्षाव व दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद असे नियमीत कार्यक्रम ट्रस्ट च्या माध्यमातून पार पाडले जातात. 
     यावर्षी गुरुवार दि.२३ मार्च २०२३ रोजी श्री.स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या प्रकटदिन कार्यक्रमानिमित्त श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट नि दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवारी पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक महापूजा करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत किर्तकार ह.भ.प. मोहन पाटील, महाराज घोटीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे. श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ट्रस्ट च्या वतीने दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले असून सर्व श्री.स्वामी समर्थ भक्तांनी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ही ट्रस्ट चे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी केले आहे.
      यावेळी ट्रस्ट चे उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर , मोहन पवार, सदाशिव जाधव, शहाजीबापू भोसले, गणेश सावंत, पिंटू मोरे, अतुल मोरे, डी.बी.जाधव, सागर व्हसमाळे, वसंत उगळे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड