जत येथील सुप्रसिद्ध श्री मायाक्का देवी व भाग्यवंती देवी ची यात्रा उत्साहात संपन्न



जतवार्ता न्यूज नेटवर्क:- येथील छत्रपती शिवाजी पेठेतील सुप्रसिद्ध श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे अत्यंत उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. जत राष्ट्रवादीचे नेते सुरेश राव शिंदे सरकार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अलका शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शिवसेना जत तालुका संपर्कप्रमुख योगोश जानकर, तसेच जतचे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व भारत सरकारच्या सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया चे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, बाबासाहेब माळी यांनी यात्रेस शुभेच्छा दिल्या.
      देवस्थानचे पुजारी सौ सुवर्णाताई आलगूर व बसवराज अलगुर महाराज यांच्या नेतृत्वाखाली यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरती, होमहवन, भजन, कीर्तन तसेच दुपारी महाआरती, महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी जत शहरातून देवीच्या पालखीची व सभेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धनगरी ढोल पारंपारिक वाद्यांचा गजरात भंडाऱ्याची उधळण करीत संपूर्ण जत शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिरासमोर हेडाम हा शस्त्रांचा पारंपारिक खेळ प्रकार सादर करण्यात आला. 

देवीचे पुजारी बसवराज यांनी भाकणूक सादर केली. त्यांनी पुढील प्रमाणे भाकणूक सांगितली...
      सृष्टी आता कलीयुगाचा अंत सुरू झाला आहे. म्हणून पृथ्वीतलावरील निसर्गामध्ये विचित्र पद्धतीने बदल होत आहेत. ऊन,वारा,वादळ, पाऊस,थंडी , भुकंप, बारामाही ,अशें निसर्ग संकटातून जगातील मोठ्या प्रमाणात मनुष्यजिवीत हाणी होईल, मरण स्वस्त तर जगणं अवघड होईल, देशातील इंद्र सत्ता जाईल या भीतीपोटी भस्मासुर व्यापारीची गुलामगिरी स्विकारुन ,महागाई असुरांचा जन्म होईल, देशात पिकणारं मालाला कवडीमोल भाव तर विदेशात जिवंत राहण्यासाठी एक वेळ अन्नासाठी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागेल. पण ईश्वर मानणारे भक्ती भावाने जगणारे लोकांना मी स्वतः पाठीवर उभं राहून त्यांची संसार रुपी जीवन नवखा पार करून घेऊन देव, धर्माचं वापर करून स्वार्थ साधनाराचा खरा चेहरा जगासमोर येईल राजकारण उलथापालथ होईल, माणसातील जनावरांचा, जनावराप्रमाणे नाश होईल असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष