फाळणी १२ ची नोंद घालण्यास विलंब | अर्जदाराची तक्रार | संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा उपोषण; सुनील बागडे
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालुक्यातील डफळापुर येथील तत्कालीन तलाठी अलका भोसले व मंडळ अधिकारी सलीम मुलाणी यांचे वर सेवा हमी कायदा २०१५ नुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल बागडे यांनी निवेदनाव्दारे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्याकडं केली आहे.
जत तहसिलदार जत यांनी दि.१० जून २०१९ रोजी आदेश क्र. ९४०/२०१९ नुसार सर्कल सिकंदर भालदार यांनी यांचे फाळणी १२ ची नोंद घालनेसाठी आदेश दिला आहे. ही नोंद घालणे व हित्त संबधितांना नोटीसा देणे व पोच घेणे याचा कालावधी नियमानुसार सदर २१ दिवस असा आहे. परंतु सदर तलाठी यांनी ४ महिन्यानंतर फेरफार १२५९० ची नोंद घातली आहे.
मंडळ अधिकार यांनी आलेल्या तक्रारी अर्जाची दखल न घेता ४ महिन्यानंतर फिफो प्रणाली नुसार फेरफार १२५९० नामंजूर केला आहे. फाळणी १२ नामंजूर करण्याचा अधिकार महसूल खात्यास नाही व न्हवता. सदर प्रकरणात तक्रारदार यांनी अप्पर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी जत यांच्या कडे लेखी तक्रार दिली आहे. तताफी जत तहसिलदार जत यांनी अध्याप त्याची दखल घेतली नाही. तक्रारदार यांनी जत तहसिलदार जत यांना मंडळ अधिकारी यांच्या साठी २४ पृष्ठे जोडले आहे. तलाठी यांच्या साठी १९ पृष्ठे जोडून खुलासा केलेला आहे. अध्याप त्यांचेवर कोणतीही कारवाई झालेली नाही. व फेरफार १२५९० हा अजून प्रलंबित आहे. सबब तलाठी श्रीमती अलका भोसले व मंडळ अधिकारी सलीम मुलाणी यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा उपविभागीय अधिकारी जत या कार्यालय समोर प्रहार संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा बागडे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment